बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत आली आहे. या फोटोवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. कंगनाचा आगामी चित्रपट धाकडचे शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत तिने व्हाइट रंगाच्या पॅन्टवर पांढऱ्या रंगाचेच ब्रालेट घातले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कंगना राणौतला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले.
संस्कृती आणि सनातनच्या गोष्टी करत नेटकऱ्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. दरम्यान आता ट्रोल करणाऱ्यांना कंगनाने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत ट्रोलर्सना सुनावले आहे.
प्राचीन भारतीय पेहरावातील एका तरुणीचा फोटो कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की, जे लोक मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक सारखे वागत आहात.
कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती थलायवी या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती लवकरच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे.