कदाचित या कारणामुळे सतत काम करतेय कंगना राणौत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 8:01 AM
कंगना राणौत सध्या बीकानेरमध्ये आपला आगामी चित्रपट 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'ची शूटिंग करते आहे. हा चित्रपट जून ...
कंगना राणौत सध्या बीकानेरमध्ये आपला आगामी चित्रपट 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'ची शूटिंग करते आहे. हा चित्रपट जून किंवा जुलैमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाशी संबंधीत आणखीन एक गोष्ट कानावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीकानेरमध्ये पाऊस सुरू आहे. चित्रपटाच्या युनिटला शूटिंग करणे कठिण जाते आहे. मात्र कंगना कोणतीही तक्रार न करता आपले कामं करते आहे. ऐवढेच नाही तर चित्रपटाच्या लोकेशनवर नेटवर्कचा प्रोब्लेम झाला आहे त्यामुळे कंगानाचा फोन ही बंद पडलाय. ती कोणाला संपर्क करु शकत नाही आहे. मात्र अशाही परिस्थिती न थांबता कंगना आपल्या टीममधील सदस्यांचे मनौधर्य वाढवते आहे. चित्रपटाची शूटिंग काहीच दिवसात पूर्ण होऊन जाईल.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंगाना अजून पूर्णपणे बरीसुद्धा झालेली नाही. गतवर्षी याच चित्रपटातील एक स्टंट सीन शूट करताना कंगना जोरात जमीनीवर कोसळली होती. ज्यानंतर तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. याच्या आधी ही तलवारबाजी करताना तिच्या सहकलाकाराची तलावार तिच्या डोक्यावर लागली होती आणि जवळपास तिला 5-7 टाके पडले होते. गतवर्षी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले रंगून आणि सिमरन चित्रपट दणाणून आपटले होते. त्यामुळे कदाचित आपल्या आगामी चित्रपटासाठी कंगना प्रचंड मेहनत घेते असेल. काही दिवसांपूर्वीच कंगना सांगितले होते की ती सतत काम करते आहे. ASLO READ : कंगणा राणौतला का आठवण आली त्या दिवसाची?'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाकडून कंगना बऱ्याच अपेक्षा आहेत. यात ती राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती.