बोल्ड आणि विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ऊर्फी जावेद सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. तिला जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देणाऱ्याला आता मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीला व्हॉट्सअॅपवर कॉलवरुन अश्लील आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
बिहारच्या नवीन गिरीला अटक
उर्फीला धमकावणारा तरुण हा बिहारचा असल्याचं तपासात उघड झालं. पाटणा शहरातील नवीन गिरी असं या तरुणाचं नाव. मुंबई पोलिसांनी बिहारला जाऊन कारवाई केली आणि त्याला ताब्यात घेतले. मुंबईत आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तर नवीन गिरी हा ३ वर्षांपूर्वी उर्फीचा ब्रोकर होता म्हणून त्याच्याकडे उर्फीचा नंबर होता. त्याने अचानक उर्फीला धमकावण्यास सुरुवात केली.
Urfi Javed : उर्फी जावेदला व्हॉट्सअॅप कॉलवरुन बलात्काराची धमकी; तक्रार दाखल
पोलिस तपासात माहिती उघड
पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या. त्याने उर्फीला भाडयाने फ्लॅट दिला होता.उर्फीने त्याचे कमिशन दिले नाही असं आरोपी पोलिसांना म्हणाला. म्हणून त्याने उर्फीला धमकावण्यात सुरुवात केली. सोशल मीडियावर तिच्याबद्दल अश्लील भाषेत लिहिले.