सारा अली खानच्या खऱ्या लव्हस्टोरीतील व्हिलन ठरली तिच्या जवळची ही व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 06:06 PM2021-04-23T18:06:35+5:302021-04-23T18:07:24+5:30
सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. साराचे तिच्या लूक्स आणि अभिनय दोन्हीसाठी खूप कौतूक केले जाते. सारा आणि तिची आई अमृता सिंगमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. शूटिंगमध्ये बिझी राहूनही बऱ्याचदा ती आईसोबत वेळ व्यतित करत असते. आता दोघांच्या संदर्भातील एक बातमी समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की, सारा अली खानचे ब्रेकअप होण्यामागे तिची आई अमृता सिंग कारणीभूत आहे. कारण तिचे म्हणणे आहे आता अशा कोणत्याच प्रकरणात ती अडकू नये.
अमृता सिंगचे म्हणणे आहे की सारा अली खानने आता तिच्या करिअरची सुरूवात केली आहे. अशात तिच्यासाठी प्रेम वगैरे योग्य नाही. माझी इच्छा आहे की या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिने फक्त आपल्या करिअरवर लक्ष द्यावे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमृताला सारा आणि कार्तिकचे नाते अजिबात पसंद नव्हते.
अमृताचे म्हणणे आहे की, सारा खूप समजूतदार आहे आणि त्यामुळे तिने विचारपूर्वक रिलेशनशीप बनवले पाहिजे.
सारा अली खानला तिचा डेब्यू चित्रपट केदारनाथमधील सहकलाकार सुशांत सिंग राजपूतसोबतही शूटिंगदरम्यान प्रेम झाले होते. पण दोघांच्या प्रेमात अमृता अडथळा बनली होती. त्यानंतर कित्येकदा अमृता आणि सारामधील वादांचे वृत्त समोर आले होते. तर एका चॅट शोदरम्यान जेव्हा अमृता सिंगला विचारले होते की जर सारा अली खान तिला न सांगता लग्न केले तर काय होईल. त्यावर अमृता म्हणाली होती की, जर ती असे करेल तर मी तिची चांगलीच धुलाई करेन.
सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती कुली नं १ चित्रपटात वरूण धवनसोबत झळकली होती. आता ती अक्षय कुमारसोबत अतरंगी रेमध्ये दिसणार आहे.