सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. साराचे तिच्या लूक्स आणि अभिनय दोन्हीसाठी खूप कौतूक केले जाते. सारा आणि तिची आई अमृता सिंगमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. शूटिंगमध्ये बिझी राहूनही बऱ्याचदा ती आईसोबत वेळ व्यतित करत असते. आता दोघांच्या संदर्भातील एक बातमी समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की, सारा अली खानचे ब्रेकअप होण्यामागे तिची आई अमृता सिंग कारणीभूत आहे. कारण तिचे म्हणणे आहे आता अशा कोणत्याच प्रकरणात ती अडकू नये.
अमृता सिंगचे म्हणणे आहे की सारा अली खानने आता तिच्या करिअरची सुरूवात केली आहे. अशात तिच्यासाठी प्रेम वगैरे योग्य नाही. माझी इच्छा आहे की या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिने फक्त आपल्या करिअरवर लक्ष द्यावे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमृताला सारा आणि कार्तिकचे नाते अजिबात पसंद नव्हते.