Join us  

आई-वडिल आणि भावा इतकिच 'ही' व्यक्ती आहे बॉबीच्या आयुष्यात खास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:02 PM

बॉबी देओल गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून दूर होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला सिनेमांची लॉटरी लागली आहे. बॉबी देओल आयुष्यात अशी एक जवळचा व्यक्ती आहे ज्याचा तो फार आदर करतो.

ठळक मुद्देबॉबी देओल लवकरच 'यमला पगला दिवाना फिर से'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका दिसणार आहे. 'यमला पगला दिवाना फिर से' हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे

बॉबी देओल गेल्या अनेक वर्षांपासून सिल्वर स्क्रिनपासून दूर होता. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला सिनेमांची लॉटरी लागली आहे. बॉबी देओल आयुष्यात अशी एक जवळची व्यक्ती आहे ज्याचा तो फार आदर करतो.  ती व्यक्ती म्हणजे दुसरा कोणी नसून बॉलिवूड भाईजान सलमान खान आहे ज्याला बॉबी आपला मोठा भाऊ मानतो. सलमानने बॉबीला फार प्रोत्साहन दिले त्याला रोज जिम जायचा सल्ला दिला आणि 'रेस ३'मध्ये त्याला महत्वाची भूमिका ही दिली. बॉबीने ह्या गोष्टीला दुजोरा देत म्हटले 'जेव्हा मी चार वर्षांनंतर काम करण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मी पुष्कळ लोकांना भेटलो नंतर सलमानने आणि साजिद नाडीयाडवालाने मला काम ही दिले, घरी जसे आपले आई- वडिल, भाऊ आपल्या द्दल विचार करतात तसेच सलमानने माझ्या मोठ्या भावाप्रमाणे माझा विचार केला आणि मला सल्ला देत गेला"सलमानबद्दल बोलताना भावूक होऊन बॉबी पुढे म्हणाला "सलमान सतत माझ्या संपर्कात असतो. तो मला फोन करून जिम ला जायचा सल्ला देत असतो सलमान ने आपल्या जिम मधील सामान माझ्या घरी पाठवले आहे आता तर मी वर्कआऊट केल्या शिवाय घराबाहेर पडत नाही, माझी जर सकाळी ७ ची शिफ्ट असेल तर मी पहाटे ३ वाजता उठून व्यायाम करतो" सलमान खान सुपरस्टार असून सुद्धा एक चांगला माणूस आहे ह्याचा अंदाज आपण त्याने आपल्या मित्रासाठी केलेल्या कामातून लावू शकतो. 'यमला पगला दिवाना फिर से' मध्ये बॉ

बॉबी देओल लवकरच 'यमला पगला दिवाना फिर से'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. 'यमला पगला दिवाना फिर से' हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन भागांप्रमाणेच बॉबी देओल आणि सनी देओल भाऊ म्हणूनच या सिनेमातही व्यक्तिरेखा साकारतील. क्रिती खरबंदा चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर धर्मेंद्र यांची भूमिका प्रेक्षकांसाठी सरप्राईज असून या नवीन भागात ते वकिलाच्या भूमिकेत दिसतील. 'यमला पगला दिवाना फिर से' हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :बॉबी देओलसलमान खान