बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचे शाही लग्न पार पडले. पण या लग्नासोबत प्रियांका व निकने काही वादही ओढवून घेतलेत. सर्वात आधी लग्नात आतीषबाजी केल्यावरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली. याचे कारण म्हणजे, प्रियांकाने स्वत: दिवाळीत फटाके न उडवण्याचे आवाहन लोकांना केले होते. पण खुद्द प्रियांकाच्या लग्नात मात्र फटाक्यांची आतीषबाजी केली. यावरून लोकांनी प्रियांकाला बरेच काही सुनावले होते. इतके कमी की काय म्हणून आता प्रियांका व निकचे लग्न पेटा (PETA- People for the Ethical Treatment of Animals) या प्राणीसुरक्षा संस्थेच्या निशाण्यावर आले आहे. होय, पेटाने निकयांकाच्या लग्नात हत्ती-घोड्यांच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पेटाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या घटनेवर आक्षेप नोंदवला आहे.
प्रियांका व निकवर ‘पेटा’ नाराज! लग्नात प्राण्यांचा छळ केल्याचा आरोप!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 12:47 PM
य, पेटाने निकयांकावर लग्नात हत्ती-घोड्यांच्या वापरावर आक्षेप घेतला आहे.
ठळक मुद्देप्रियांका व निक या दोघांनी पेटाच्या आक्षेपावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण ते काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.