आयुष्यमान खुराणाचा आगामी सिनेमा ‘बाला’ वादात अडकला आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. ‘उजडा चमन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत, ‘बाला’चे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. ‘बाला’चे दिग्दर्शक दिनेश विजान यांनी कॉपी राईट्सचे उल्लंघन केल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालय येत्या 4 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी करेल.
काय आहे वाद‘उजडा चमन’च्या मेकर्सनी ‘बाला’च्या मेकर्सवर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ‘उजडा चमन’ हा Ondu Motteye Kathe या कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे आणि मी ओरिजनल चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत, असे ‘उजडा चमन’चे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी सांगितले. मुंबई मिररशी बोलताना ते म्हणाले की, 2018 मध्ये आम्ही Ondu Motteye Kathe चे हक्क विकत घेतले. याचा रिमेक 2019 मध्ये रिलीज करण्याचा आमचा उद्देश होता. माझा चित्रपटासाठी 8 नोव्हेंबर ही रिलीज ठेवण्यात आली. याऊलट ‘बाला’च्या रिलीज डेटसंदर्भात आधीपासूनच गोंधळ होता. आधी 22 नोव्हेंबर, त्याआधी 15 नोव्हेंबर अशा अनेक डेट त्यांनी बदलवल्या. आता माझ्या चित्रपटाच्या एक दिवस आधी म्हणजे 7 नोव्हेंबरला ‘बाला’ रिलीज होतोय.
दिनेश विजान म्हणतात,दुसरीकडे ‘बाला’चे दिग्दर्शक दिनेश विजानने या मुद्यावर एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘बाला’ या प्रोजेक्टवर आमचे खूप दिवसांपासून काम सुरु होते. हा चित्रपट आमच्यासाठी एम महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. टक्कल आणि सावळा रंग यासारख्या सोशल मुद्यांवर आणखीही चित्रपट असू शकतात. यानिमित्ताने उत्तम चित्रपट निवडण्याचे पर्याय प्रेक्षकांजवळ आहेत. यात काहीही गैर नाही.