Join us  

करिना बाळाच्या स्वागतासाठी आतूर...पाहा बेबी बम्पमधील बेबोचे फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 2:02 PM

 करिना बाळाच्या स्वागतासाठी आतूर...पाहा बेबी बम्पमधील बेबोचे फोटो...बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर कुठल्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. ...

 करिना बाळाच्या स्वागतासाठी आतूर...पाहा बेबी बम्पमधील बेबोचे फोटो...बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर कुठल्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात करिनाची डिलीवरी होणे अपेक्षित आहे. पण दिवस भरत आल्याने कुठल्याही क्षणी डिलिवरी होऊ शकते. प्रेग्नंसीचे नऊ महिने करिनाने अगदी मस्तपैकी एन्जॉय केले. सुुरुवातीच्या काही महिने प्रेग्नंसीची बातमी तिने दडवून ठेवली. पण ती दडवणार किती दिवस? योग्य वेळ येताच, करिनाचा लाडका हबी सैफ अली खान याने ही गोड बातमी सर्वांशी शेअर केली. यानंतर करिना व सैफवर शुभेच्छांचा एकच वर्षाव झाला. बेबी बम्पसह अनेक इव्हेंटला करिनाने हजेरी लावली. अगदी बेबी बम्पसह रॅम्पवॉकही केले. इतकेच नाही तर अनेक कमर्शिअलचे शूटींगही केले. म्हणजेच प्रेग्नंसीदरम्यानही तिने तिचे काम चालूच ठेवले. अलीकडे करिना व सैफ यांनी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. नवाबी थाटात केलेल्या या फोटोशूटमध्ये स्वत:चे बेबी बम्प दाखवायला करिना जराही कचरली नाही. पाहुयात करिनाचे बेबी बम्पमधले असेच काही फोटो.. करिनाची लव्ह स्टोरी‘टशन’ या सिनेमाच्या दरम्यान सैफ-करीनाच्या प्रेमप्रकरणाची बातमी वणव्यासारखी बॉलीवूडमध्ये पसरली होती. या सिनेमाची शूटिंग संपल्यानंतर एका रात्री फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने मीडियाच्या प्रतिनिधींना एक हिंट दिली होती.एका फॅशन शोदरम्यान बॉलिवूडमधील मोठी बातमी उघड होणार असल्याचं मनिषने सांगितलं होतं. ती बातमी होती, करिना व सैफ एकत्र येणार ही. पण तो फॅशन शो सुरु होण्यापूर्वीच सैफिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याची खबर मीडियाला मिळाली होती. यानंतर सैफ-करीना हाताहात घालून ‘त्या’ फॅशन शोसाठी हजर होते. याच फॅशन शोमध्ये सैफने करीनाशी असलेल्या संबंधाची खुलेआम कबुली दिली होती.करीनाने कधीच आपलं खासगी आयुष्य लपवून ठेवलं नाही. सैफशी असलेले संबंध तिने जास्त काळ लपवून ठेवले नाहीत. शाहीद कपूरशी असलेले संबंधही तिने कधीच लपवून ठेवले नव्हते. एका व्हॅलेंटाईन स्पेशल शो दरम्यान शाहीद- करीना या प्रेमीयुगुलाने त्यावेळी आॅफिशीअल डेटींग केलं होतं. पुढे शाहिदशी तिचं ब्रेकअप झालं.पण ब्रेकअपनंतर तिने शाहीद विषयी कधीच वेडेवाकडे शब्द वापरले नाहीत.