Join us

मम्मी गौरीने शेअर केला लेकीचा फोटो; यूजर्सनी म्हटले, ‘ही तर पापा शाहरुखची कार्बन कॉपी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 2:11 PM

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असते. सुहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यास यूजर्सकडून तुफान पसंत केले जात आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो वाºयासारखा व्हायरल होत असतो. असाच सुहानाचा एक फोटो तिची आई गौरीने शेअर केला. हा फोटो शेअर करताना गौरीने त्याच्या कॅप्शनमध्ये ‘Having the time of your life in your teens ...’ असे लिहिले. सुहानाचा हा फोटो यूजर्सकडून चांगलाच पसंत केला जात आहे. त्याचबरोबर यूजर्सकडून तिचे कौतुकही केले जात आहे. एका यूजर्सनी लिहिले की, ‘सुहाना आपल्या वडिलांवर गेली आहे.’ तर दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘सुहाना शाहरुखची कार्बन कॉपी आहे.’दरम्यान, सुहाना बॉलिवूडमध्ये केव्हा एंट्री करणार याविषयी सध्या चर्चा रंगली आहे. खरं तर सुहानाला बॉलिवूडमध्येच करिअर करायचे आहे. परंतु तत्पूर्वी तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. दरम्यान, सुहाना लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. ती नेहमीच मित्रांसोबत पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसते. विशेष म्हणजे, यादरम्यान तिच्या बॉडी लॅँग्वेजमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसतो. त्यामुळेच किंग खानची लाडकी सध्या तिच्या स्टाइल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्सने सगळ्यांनाच इम्प्रेस करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर सुहानाचा मेकओव्हर, लूक आणि तिचा ड्रेसिंग सेन्स बीटाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.  सध्या आयपीएल सुरू असून, ती कोलकाता नाइट रायडर्स या तिच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर दिसून आली. स्टेडियममध्ये सुहानासोबत शाहरुख आणि तिचे मित्रही बघावयास मिळाले. यावेळीदेखील सुहानाच्या लूकवरून चर्चा रंगल्याचे दिसून आले. दरम्यान, सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूची संपूर्ण जबाबदारी पापा शाहरुखने निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरवर सोपविली आहे. त्यामुळेच सुहाना बºयाचदा करणसोबत दिसून आली.