Join us

PHOTOS: प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घराची किंमत वाचून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 08:00 IST

प्रियंकाचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घरात आहे सात बेडरूम

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने तिच्यापेक्षा दहा वर्षे लहान असणाऱ्या हॉलिवूड सिंगर व अभिनेता निक जोनससोबत लग्न केले. या वर्षी जानेवारीत या दोघांनी अमेरिकेतील एनसिनोमध्ये एक आलिशान घर विकत घेतले. हे घर तीन एकर जमिनीवर वसले आहे. लॉकडाउनमध्ये प्रियंका चोप्राच्या घरात फेरफटका मारूयात.

न्यूयॉर्कमधील प्रियंका व निकचे घर खूप आलिशान आहे.

प्रियंकाच्या घरात लिविंग रूम व खूप मोठा डायनिंग टेबल आहे. जिथे प्रियंका व निक यांचे कुटुंब आरामात बसून जेवू शकतात.

प्रियंकाच्या या घरात सात बेडरूमशिवाय 11 बाथरूम आहेत.

याशिवाय या घरात जिम, मुव्ही थिएटर, वेट बार, गेम रूम, इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, एक बॉलिंग एली, इन्फिनिटी पूल, एक लॉन असे प्रशस्त घर आहे.

प्रियंका चोप्रा व निक जोनासचे घर एनकिनो कॅलिफोर्नियामध्ये आहे. एका वेब पोर्टलच्या रिपोर्टनुसार या घराची किंमत 20 मिलियन डॉलर म्हणजेच 142 कोटी रुपये इतकी आहे.

प्रियंकाच्या घरात गाडींसाठी अंडरग्राउंड गॅरेजचीदेखील सुविधा आहे.

प्रियंका व निकच्या घरातून निसर्गदेखील पहायला मिळतो.

प्रियंका चोप्राने 1 व 2 डिसेंबर 2018 ला निक जोनाससोबत जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली होती.

प्रियंका व निक बऱ्याचदा त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत येत असतात.

प्रियंका शेवटची द स्काय इज पिंक सिनेमात झळकली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास