यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये केवळ कुटुंबाचे सदस्य आणि खास पाहुण्यांना निमंत्रित केले गेले होते.
वेन्यूबद्दल सांगायचे तर अख्खा वेन्यू पांढ-या फुलांनी सजवण्यात आला होता. याठिकाणी नवरा नवरी अर्थात प्रियांका व निक यांच्या नावाचा ट्रेडमार्क ‘एनपी’ लोगो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
वेन्यूची ही सजावट निकयांकाच्या रोका विधीदरम्यान करण्यात आलेल्या सजावटीची आठवण करून देणारी होती.
अन् प्रियांकाने करून दिली निकची ओळख
रिसेप्शनदरम्यान प्रियांकाने असे काही केले की, सगळ्यांनाच हसू आवरणे कठीण झाले. प्रियांका स्टेजवर आले आणि अचानक आपल्या स्पीचदरम्यान अगदी लाजत लाजत तिने निकची ओळख करून दिली. और...ये है मेरे पति निक जोनास...असे प्रियांका म्हणाली. प्रियांकाचा हा अंदाज पाहून सगळ्यांच्याच चेह-यावर हसू फुलले.