Join us

वाढलेली दाढी, केसांच्या जटा...; सैफ अली खान बनला नागा साधू! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:49 PM

सैफ अली खानने गेल्या काही दिवसांपासून दाढी वाढवलीयं. केसही वाढवलेत. याचे कारण म्हणजे, ‘हंटर’ या आपल्या आगामी चित्रपटात सैफ अली नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सैफ अली खानने गेल्या काही दिवसांपासून दाढी वाढवलीयं. केसही वाढवलेत. याचे कारण म्हणजे, ‘हंटर’ या आपल्या आगामी चित्रपटात सैफ अली नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे. सैफ नागा साधू बनणार म्हटल्यावर त्याचे हे लूक पाहण्यास सगळेच उत्सूक असणार. तेव्हा सैफच्या या फर्स्ट लूकचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

 होय, वाढलेली दाढी, केसांच्या जटा असे त्याचे लूक आहे. त्याचे हे लूक हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपची आठवण करून देणारे आहे. ‘पायरेट्स आॅफ कॅरिबेन’ सीरिजमध्ये जॉनी काहीशा अशाच लूकमध्ये दिसला होता.

अलीकडे सैफने या भूमिकेबद्दल सांगितले होते. ‘हंटर’चे शूटींग राजस्थानमध्ये झाले. यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. शरीरावर ब-याच ठिकाणी टोचून घेतंले. केस वाढवलेत, दाढी वाढवली. या वाढलेल्या दाढी व केसांसोबत राजस्थानच्या गर्मीत शूटींग करणे अतिशय कठीण होते. शूटींगपूर्वी केसांचे सेटअप करण्यासाठी मला रोज ४० मिनिटांचा वेळ लागत असे. ५० दिवसांच्या या शूटनंतर माझ्यात अनेक बदल झालेत. माझ्या स्पॉटबॉयलाही हे बदल जाणवले. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग संपले आहे. लवकरच मी माझ्या क्लिनशेव्ह लूकमध्ये दिसेल, असे तो म्हणाला होता.दीर्घ काळापासून सैफच्या नावावर एकही हिट चित्रपट नाही. एकापाठोपाठ एक अनेक फ्लॉप दिल्यानंतर सैफच्या करिअरची करिअरची नौका डगमगू लागली होती. अशात त्याच्याकडे ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसीरिज चालून आली आणि सैफचे ग्रह बदलले. ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. यातील सैफचा अभिनय आत्तापर्यंतच्या त्याच्या फिल्मी करिअरमधील सर्वोत्तम अभिनयही असल्याचे म्हटले गेले. या प्रोजेक्टनंतर सैफकडे अनेक चांगल्या आॅफर्स चालून येत आहेत. 

टॅग्स :सैफ अली खान