आता बास...!! अमिताभ बच्चन यांच्या ‘कोरोना कॉलर ट्यून’विरोधात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 01:54 PM2021-01-07T13:54:10+5:302021-01-07T14:04:27+5:30
कोरोनापेक्षा ‘कोरोना कॉलर ट्युन’ने छळले...
‘नमस्कार, हमारा देश और पूरा विश आज कोरोना की चुनौती का सामना कर रहा है. कोव्हिड 19 अभी खत्म नहीं हुआ है...’, ही कॉलर ट्यून तुम्ही ऐकली असेलच. कोणलाही कॉल केला की, पलीकडून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही कॉलर ट्यून ऐकू येते. अनेक महिन्यांपासून लोकांनी ही कॉलर ट्यून सहन केली. पण आताश: लोक चांगलेच वैतागले आहेत. कोरोपापेक्षा या कॉलर ट्यूनने लोकांना जास्त छळले. पण आता बास. कारण आता या कॉलर ट्यूनविरोधात दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही जनहित याचिका कोणी दाखल केली, याबद्दल माहिती नाही. पण आता हे कॉलर ट्यूनचे प्रकरण कोर्टात गेलेय, इतके मात्र खरे.
PIL filed in Delhi High Court seeking the removal of mobile caller tune on #COVID19 awareness in the voice of actor Amitabh Bachchan
— ANI (@ANI) January 7, 2021
अलीकडे ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल एका वैतागलेल्या चाहतीने थेट अमिताभ यांना केला होता. यावर अमिताभ यांनी काय उत्तर द्यावे, तर त्यांनी चक्क माफी मागितली होती.
होय, क्षमा त्रिपाठी नावाच्या या चाहतीला कमेंटला उत्तर देताना अमिताभ यांनी माफी मागितली होती. ‘त्रिपाठीजी, तुमचे आभार. पण ती कॉलर ट्यून माझा निर्णय नाही. कोरोना काळात डब्ल्यूएचओमार्फत एक कॅम्पेन आहे आणि तुम्ही त्याला आवाज द्या, आमही हा व्हिडीओ देशभर दाखवू, असे सरकारकडून मला सांगण्यात आला. आता सरकारने त्याचीच कॉलर ट्यून बनवली. अशात मी काय करणार? मी देशासाठी आणि समाजासाठी जे काही करतो, ते नि:शुल्क करतो. कुठलीही स्क्रिप्ट वगैरे नसते. बस्स, करतो. तुम्हाला या कॉलर ट्यूनचा त्रास होतोय तर मी माफी मागतो. मात्र माज्या हातात करण्यासारखे काहीही नाही...,’असे अमिताभ यांनी लिहिले होते.
माफी मागतो, पण...! ‘कोरोना’ कॉलर ट्यूनने वैतागलेल्या चाहतीला अमिताभ यांनी असे दिले उत्तर