Join us  

व्हर्जिन आहेस का?  टायगर श्रॉफनं दिलं ‘सलमान स्टाईल’ उत्तर, ऐकून अरबाज खानही लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 5:24 PM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ म्हणजे तरूणाईचा लाडका हिरो. टायगर त्याच्या फिटनेस व डान्समुळे सतत चर्चेत असतो. अलीकडे टायगर अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमध्ये पोहोचला.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर टायगर लवकरच ‘हिरोपंती 2’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘गणपत’ हा त्याचा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) म्हणजे तरूणाईचा लाडका हिरो. टायगर त्याच्या फिटनेस व डान्समुळे सतत चर्चेत असतो. अलीकडे टायगर अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शोमध्ये पोहोचला. या शोमध्ये टायगरला अनेक प्रश्न विचारले गेलेत आणि टायगरने या प्रश्नांची भन्नाट उत्तरे दिलीत. या शोचा प्रोमो नुकताच रिलीज केला गेला. यात अरबाज टायगरला सोशल मीडियावरच्या कमेंट्सवर प्रश्न विचारताना दिसतोय. अरबाज टायगरला सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या कमेंट्स आणि प्रश्न वाचून दाखवतोय. यादरम्यान तू व्हर्जिन आहेस का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला. अरबाजने चाहत्याचा हा प्रश्न वाचून दाखवताच. हो, मी सलमान भाईसारखाच व्हर्जिन आहे, असे उत्तर टायगरने दिले. टायगरचे हे उत्तर ऐकून अरबाज जोरजोरात हसायला लागला.हा प्रोमो आणि यात टायगरने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होतेय.

लोक उडवायचे खिल्लीया शोमध्ये टायगरने करिअरच्या सुरूवातीचे काही अनुभवही शेअर केलेत. करिअरच्या सुरूवातीला लोकांनी माझी प्रचंड खिल्ली उडवली. पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच माझ्या लुक्सवर नको ते बोलले. यार, हा हिरो आहे की हिरोईन? हा जॅकी श्रॉफचा मुलगा अजिबात वाटत नाही, अशा अनेक हेट कमेंट्स मला ऐकायला मिळाल्या, असे टायगर म्हणाला. मी याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या फिजिक्सवर काम केले, असे त्याने सांगितले. टायगर श्रॉफ दिशा पाटनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असे म्हटले जाते. अर्थात टायगर वा दिशा या दोघांपैकी कोणीही याची कबुली दिलेली नाही. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर टायगर लवकरच ‘हिरोपंती 2’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘गणपत’ हा त्याचा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

 

टॅग्स :टायगर श्रॉफअरबाज खान