अमिताभ यांनी आपल्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण म्हणूनही ट्विट केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू, अँड्रिया तरियांग, निर्माते शूजित सरकार आदी उपस्थित होते.तापसी पन्नू हिनेही आपल्या ट्विटरवर हा क्षण आपल्या आनंदातील सर्वात मोठा असल्याचे सांगून भारताच्या राष्टÑपतींशेजारी बसण्याचा मान मिळाला, हे आपले भाग्य असल्याचे म्हटले आहे.पिंक हा २०१६ साली चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, अँड्रिया तरियांग यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकांमुळे अमिताभ बच्चन यांना स्टार स्क्रीन आणि स्टारडस्ट अॅवॉर्डस्ने गौरविले होते.स्त्री-पुरुष समानतेवर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाने ६८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.T 2445 - The President of India Hon. Shri Pranab Mukherji, saw our film PINK and then called us over for Dinner at the Rashtrapati Bhavan pic.twitter.com/cPc9vDnt3T— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 25, 2017
पिंकचे चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 12:14 PM
‘पिंक’ या चित्रपटाचे राष्टÑपती भवनात स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले. राष्टÑपतींनी हा चित्रपट पाहून कौतुक केले.अमिताभ बच्चन यांनी आपल्या ...
‘पिंक’ या चित्रपटाचे राष्टÑपती भवनात स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले. राष्टÑपतींनी हा चित्रपट पाहून कौतुक केले.अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली आहे. राष्टÑपतींनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पिंकच्या टीमसह त्यांचे छायाचित्र शेअर केले आहे. याचा आनंद अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आहे. राष्टÑपतींनी या टीमला रात्रीभोजसाठीही आमंत्रित केले होते.