Join us

'पिस्ता आदमी ही हैं'; मजेशीर अंदाजात रितेश देशमुखने मांडली लग्नानंतरची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 13:43 IST

Riteish deshmukh: रितेशने इन्स्टाग्रामवरील एका मजेशीर ऑडिओवर व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (genelia deshmukh). आज महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणूनही या दोघांकडे पाहिलं जाते. ही जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे कायम ते सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करत असतात. यात सध्या रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रितेशने इन्स्टाग्रामवरील एका मजेशीर ऑडिओवर व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओमध्ये जेनेलिया काजूचं पाकीट उघडण्याचा प्रयत्न करत आहे. ते पाहून रितेशने त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. “पत्नीया कितना भी काजू-बदाम खाये, पिस्ता आदमी ही हैं असं तो म्हणाला आहे. थोडक्यात, बायकोने कितीही काजू-बदाम खाल्ले, तरीही कायम नवराच भडला जातो असं रितेशने मजेमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीत व्हायरल झाला आहे.  अवघ्या काही तासांमध्ये या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. रितेश आणि जेनेलिया हे लोकप्रिय कपल आहे. २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. रितेश लवकरच 'हाऊसफूल ५' या सिनेमात झळकणार आहे. नुकतीच त्याने या सिनेमाची घोषणा केली असून हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. तर, जेनेलियाचा 'ट्रायल पीरिअड' हा सिनेमा २१ जुलै २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाबॉलिवूडसिनेमा