Join us

​पहलाज निहलानींचा ‘जुली-२’ ठरला ‘संस्कारी’!! Passes With No Cuts!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:06 AM

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी फार कमी वेळात ‘संस्कारी’ अशी ओळख निर्माण केली होती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ...

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी फार कमी वेळात ‘संस्कारी’ अशी ओळख निर्माण केली होती. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असतानाच या ‘संस्कारी बाबू’नी सगळ्यांच्याच नाकीनऊ आणले होते. इतके की,  अनेक निर्माते- दिग्दर्शकांनी त्यांच्याविरोधात उघड उघड मोर्चा उघडला होता. अनेक चित्रपटांतील सीन्सला कात्री लावल्यामुळे निहलानी चांगलेच वादग्रस्त ठरले होते.  आता पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नाहीत. पण तरिही चर्चेत आहेत.होय, निहलानींचा ‘जुली-२’ हा चित्रपट येतोय. निहलानी या चित्रपटाचे प्रेझेंटर आणि डिस्ट्रिब्युटर आहेत. खरे तर पूर्णपणे ‘क्लिन अ‍ॅडल्ट फिल्म’ असलेल्या या चित्रपटाशी ‘संस्कारी बाबू’ पहलानी यांचे नाव जुळणे,हे सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. पण पहलानींचा यावरचा युक्तिवाद एकदम स्पष्ट आहे. केवळ बोल्ड सिनेमा  म्हणून मी ‘जुली-२’शी जुळलो नाही तर एक इंटरेस्टिंग स्टोरी म्हणून मी या चित्रपटाचा प्रेझेंटर अन् डिस्ट्रिब्युटर बनलो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सांगायचा मुद्दा हा की, पहलानींचा हाच सिनेमा सध्या चर्चेत आहे. होय, सेन्सॉर बोर्डाने म्हणे या चित्रपटाला कुठल्याही कटशिवाय पास केले आहे. होय,‘जुली-२’ला नो कट्सह ‘ए’ सर्टिफिकेट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे,  अनेक बोल्ड आणि हिंसक दृश्यांवर आक्षेप घेणारे पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. मी स्वत: सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष असतो तर मी सुद्धा या चित्रपटाला विना कट ‘ए’ सर्टिफिकेटच दिले असते. हा चित्रपट कुठल्याही कटशिवाय पास होईल, हे मला ठाऊक होते. चित्रपट बोल्ड विषयावर आधारित आहे. त्यामुळे तो बोल्ड आहेच. पण त्यात न्यूडिटी नाही. शिवाय कुठेच डबल मीनिंगचे संवाद नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. ALSO READ : ‘जुली-२’चे टीजर रिलीज होताच बॉलिवूडची न्यू सेन्सेशन बनली राय लक्ष्मी !!‘जुली-२’मध्ये साऊथची   अभिनेत्री राय लक्ष्मी मुख्य भूमिकेत आहे. ती अतिशय बोल्ड रूपात या चित्रपटात दिसणार आहे.‘जुली-२’ हा चित्रपट २००४ मध्ये आलेल्या ‘‘जुली’ चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘जुली’मध्ये नेहा धूपिया मुख्य भूमिकेत दिसली होती. याच्या सीक्वलमध्ये मात्र राय लक्ष्मीची वर्णी लागली आहे.