या ठिकाणी झाली होती लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 7:21 AM
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी १९६० मध्ये त्यांच्या करियरला सुरुवात केली. त्यांनी एकाहून एक सरस गाणी बॉलिवूडला दिली आहेत. झी क्लासिकवरील क्लासिक ...
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी १९६० मध्ये त्यांच्या करियरला सुरुवात केली. त्यांनी एकाहून एक सरस गाणी बॉलिवूडला दिली आहेत. झी क्लासिकवरील क्लासिक लिजंड्स या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बॉलिवूड करियरमधील चढ-उतारांविषयी जाणून घेता येणार आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या दोघांचेही बालपण हलाखीत गेले. ते लहान वयातच संगीताकडे ओढले गेले होते. खरेतर, ही जोडी मुंबईतील रणजित स्टुडिओज मध्ये क्रिकेटच्या खेळाच्या दरम्यान एकमेकांना भेटले होते. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ६३५ सिनेमात आणि ३८१० हून अधिक गाण्यांना संगीत दिले. त्यांचा एकत्र पहिला सिनेमा होता पारसमणी. या सिनेमाची सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. विशेषतः हँसता हुआ नुरानी चेहेरा. त्यानंतर दोस्ती, मिलन, ड्रीम गर्ल, सौदागर, मि. इंडिया आणि अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मेरे मेहबूब कयामत होगी, सावन का महिना, चिठ्ठी आयी है आणि काटे नही कटते या त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांची मोहिनी आजही लोकांवर कायम आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना त्यांचे मार्गदर्शक मानत. त्यांनी या दोघांना अनेकवेळा साहाय्य केले होते. बॉबी या सिनेमाच्या वेळी, नामवंत दिग्दर्शक राज कपूर यांनी जेव्हा त्यांच्या रचना ऐकल्या, तेव्हा ते त्यांच्या सन्मानार्थ खाली वाकले होते. एवढेच नाही तर ते म्हणाले होते की, देवी सरस्वती त्या दोघांमध्ये वास करते.” जावेद अख्तर यांनी अशा अनेक आठवणी या कार्यक्रमात शेअर केल्या. लक्ष्मीकांत-प्यारेलाल त्या काळातील सगळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे प्रचंड लाडके होते.क्लासिक लिजंड्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद अख्तर करत असून भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या कार्यातून ठसा उमटवलेल्या व्यक्तिमत्त्वांची ते आपल्या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना ओळख करून देतात. क्लासिक लिजंड्स या सिझनमध्ये भारतीय सिनेमाला आपले अमूल्य योगदान दिलेल्या १३ कलाकारांच्या जीवनात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.हिंदी सिनेमामध्ये भरीव कामगिरी केलेल्या महान व्यक्तिमत्त्वांची प्रेक्षकांना माहिती व्हावी या हेतूने क्लासिक लिजंड्सची सुरुवात करण्यात आली होती.Also Read : या दिग्गज अभिनेत्याने एक्स्ट्रा म्हणून अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम