Last Video Of KK: कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये... समोर आले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 10:21 AM2022-06-01T10:21:55+5:302022-06-01T11:50:52+5:30

KK or Krishnakumar Kunnath Video Before Death: कोलकात्यात केके एक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागलं...त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत...

playback singer kk or krishnakumar kunnath death last video viral | Last Video Of KK: कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये... समोर आले व्हिडीओ

Last Video Of KK: कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये... समोर आले व्हिडीओ

googlenewsNext

KK or Krishnakumar Kunnath Death: तडप तडप, दिल इबादत, याद आएंगे ये पल यासारखे हिट गाणी देणारा बॉलिवूडचे लोकप्रिय गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ (KK or Krishnakumar Kunnath) याचं कोलकात्यात निधन झालं. त्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलकात्यात केके एक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागलं. इव्हेंट सुरू असतानाच स्टेजवर त्याने याचा उल्लेख केला होता. यानंतर ताबडतोब टीम केकेला घेऊन हॉटेलला रवाना झाली. 

रिपोर्टनुसार, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळाने केकेच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्याला सीएमआरआय रूग्णालयात हलवण्यात आलं. हॉटेलपासून काही किमी. दूर असलेल्या या रूग्णालयात केकेला मृत घोषित करण्यात आलं. तूर्तास त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत केकेच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता स्पष्टपणे दिसतेय.

‘मिरर नाऊ’ने केकेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात केकेला लाईव्ह स्टेजवरून बाहेर नेलं जात आहे. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत आहेत. तो अस्वस्थ होता, त्याला कसलातरी त्रास होत होता, हे व्हिडीओत जाणवतंय. यादरम्यानही काही चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

दुसरा व्हिडीओही व्हायरल
यंगिस्तान नावाच्या ट्विटर हँडलवर केकेचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. यात तो लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उपस्थित गर्दीला चीअरअप करण्यासाठी सांगतो. याचदरम्यान तो अचानक बॅक स्टेजला येतो. बॅक स्टेजला लगेच त्याच्या शरीरावर लागलेले माइक्स काढले जातात आणि त्याला बाहेर नेलं जातं.

रूग्णालयात पोहोचण्याआधीच...
31 मे 2022 च्या मध्यरात्री केकेची प्रकृती बिघडली. कोलकात्याच्या नजरूल मंचावर तो परफॉर्म करत होता. आॅडिटोरिअममध्ये हजारोंची गर्दी होती. त्याला ताबडतोब रूग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Web Title: playback singer kk or krishnakumar kunnath death last video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.