विविधांगी भूमिका साकारायच्यात - अर्जुन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2016 11:13 AM
‘ईश्कजादे’ आणि ‘गुंडे’ मध्ये अर्जुन कपूर याने उत्तम भूमिकांचे सादरीकरण केले आहे. तो म्हणतोय की,‘भूमिकेला असलेले विविधांगी शेड्स मला ...
‘ईश्कजादे’ आणि ‘गुंडे’ मध्ये अर्जुन कपूर याने उत्तम भूमिकांचे सादरीकरण केले आहे. तो म्हणतोय की,‘भूमिकेला असलेले विविधांगी शेड्स मला अनुभवायचे आहेत. मला खलनायकाची भूमिका आॅनस्क्रीन करायला खुप आवडेल. ग्रे शेड्स असलेल्या भूमिका मला करावयाच्या आहेत. मी नशीबवान आहे की, मला तशा भूमिका करायला मिळाल्या आणि मला मिळतीलही.’ अर्जुनने अनेक चित्रपटांत लव्हरबॉयची भूमिकाही केली आहे. ‘ईशकजादे’ मधून त्याने चित्रपटसृष्टीत डेब्यू केला आहे. माझ्या भूमिकेला खुप ग्रे शेड्स आहेत. ‘औरंगजेब’ मध्ये मी सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. मला बांधील भूमिका करायलाही आवडणार नाहीत. मला वाटतं की, नवोदित अभिनेत्यांनी विविध प्रकारच्या भूमिका करायला हव्यात.’