पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण चित्रपटाला असलेला काही राजकीय पक्षांचा विरोध मात्र अद्यापही शमलेला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर ते आचारसंहितेचे उल्लंघन होईल. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना या चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय फायदा होईल. म्हणूनच सध्या तरी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फोटाळून लावली आणि चित्रपटाच्या मार्गातील कायदेशीर अडथळा दूर झाला. अर्थात काँग्रेस व डाव्या पक्षांनी या चित्रपटाला चालवलेला विरोध थांबलेला नाही. आता भाजपाने यासंदर्भात आपली भूमिका व्यक्त केली आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’शी आम्हाला काहीही देणेघेणे नाही! भाजपाची भूमिका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 11:26 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण चित्रपटाला असलेला काही राजकीय पक्षांचा विरोध मात्र अद्यापही शमलेला नाही.
‘पीएम नरेंद्र मोदी’शी आम्हाला काहीही देणेघेणे नाही! भाजपाची भूमिका!!
ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता विवेक ओबरॉय मुख्य भूमिकेत आहे.