Join us

PM Narendra Modi Biopic : विवेक ऑबेरॉय म्हणाला, ही तर हुकूमशाही आहे, आपण लोकशाहीत राहतो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 6:30 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोदींच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. हा चित्रपट सुरूवातीपासून राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्षांनी हा चित्रपट निवडणूक संपल्यानंतर प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. मात्र कोर्ट व निवडणुक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला आहे.  

या दरम्यान इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विवेक ऑबेरॉय म्हणाला की, पीएम नरेंद्र मोदी बायोपिक प्रदर्शित व्हायला पाहिजे. हा चित्रपट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनादेखील आवडेल. 

चित्रपटाला राजकीय विरोध होत आहे, त्यावर आपले मत व्यक्त करताना विवेकने सांगितले की, 'पीएम नरेंद्र मोदींच्या प्रदर्शनापूर्वी दुसरे राजकारणावर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु आता माझ्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची आता वार्ता सुरू आहे.'

बहुचर्चित चित्रपट गांधीवर देखील लोकांनी टीका केली होती. म्हणाले होते की या चित्रपटाच्या तथ्यांसोबत छेडछाड केली आहे. मी चित्रपट भक्तांसाठी नाही तर देशभक्तांसाठी बनवला आहे. लोक कमतरतेवर टीका तर करणारच, असे विवेक म्हणाला.

विवेकने पुढे सांगितले की, 'जर राहुल गांधी पीएम नरेंद्र मोदी चित्रपट पाहतील तर त्यांना तो नक्कीच आवडेल. कारण ते देशभक्त आहेत.'लोकसभा निवडणुकीपूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विवेकने सांगितले की, 'मला कोणी सांगू शकत नाही की चित्रपट कधी प्रदर्शित करायचा. ही तर हुकूमशाही आहे. आपण लोकशाहीत राहतो. इथे तुमच्या बापाचे नाव नाही तर तुमचे काम चालणार.'

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचे दिग्दर्शन ओमंग कुमारने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुरेश ऑबेरॉय, आनंद पंडीत, संदीप सिंग व आचार्य मनीष यांनी केली आहे.

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय