बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. पण सतत नवनव्या गोष्टी करण्यासाठी धडपडत असलेल्या अक्कीने यावेळी चांगलीच अनोखी संधी साधली. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘नॉन पॉलिटिकल’ मुलाखत घेण्याची संधी अक्षयला मिळाली. याचा टीजर व्हिडीओ अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘संपूर्ण देश निवडणूक आणि राजकारण याबद्दल बोलत असताना, हा थोडा ब्रेक़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्णपणे नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू घेण्याचे भाग्य मला लाभले...,’ असे अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले.
अक्षय, ही मुलाखत घेताना तू पत्नी टिष्ट्वंकलला सोबत घ्यायला हवे होते. कमीत कमी तिने खरे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले असते. तुझ्यासारखे जोक्स ऐकवले नसते, असा एका युजरने लिहिले. एका युजरने तर यानिमित्ताने अख्ख्या बॉलिवूडला लक्ष्य करत, बॉलिवूडला ‘दलालीवूड’ असे नवे नाव दिले.