Join us

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकला पुन्हा शुक्लकाष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 2:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी बायोपिक उद्या प्रदर्शित होणार होता. मात्र पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी बायोपिक उद्या प्रदर्शित होणार होता. मात्र पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. मात्र त्यांनी पीएम नरेंद्र मोदी बायोपिक केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित करण्याची योजना आखली होती. मात्र ती योजना निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे निर्मात्यांसमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर आचारसंहिता भंग होईल का, याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते. तसेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. मात्र आज निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावला आहे.

पण आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय