बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)चा आगामी प्रोजेक्ट 'पोचर'(Poacher Web Series)चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ही एक वेबसीरिज असून याची पहिली झलक पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा आला आहे. ही सीरिज सत्य घटनेवर आधारीत आहे. पोचर वेबसीरिजची कथा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हस्तिदंत शिकार टोळीवर आधारित आहे. 'पोचार'च्या पहिल्या झलकमध्ये, आलिया भट जंगलात उभं राहून सांगताना दिसते की 'मर्डर इज मर्डर'. आलिया भट कार्यकारी निर्माती म्हणून या मालिकेशी जोडली गेली आहे.
पोचरची पहिली झलक १२० सेकंदाच्या व्हिडीओची सुरूवात एका जंगलापासून होते. तिथे वन अधिकारी आलिया भटची एंट्री होते. त्यानंतर आलिया भटच्या चेहऱ्यावर तीव्र भाव दिसून येतात आणि पार्श्वभूमीतून अभिनेत्रीचा आवाज येतो की 'आज सकाळी ९ वाजता अशोकच्या हत्येची बातमी आली. या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्याचे शरीर निर्जीव होते... वाईट अवस्थेत. अशोक फक्त १० वर्षांचा होता. त्याला त्याचे मारेकरीही दिसले नाहीत. पुरावे गोळा करताना, एक महिला वन अधिकारी म्हणून दिसणारी आलिया भट म्हणते की, 'त्यांना वाटते की तो पळून जाईल, पण नाही. अशोक आपल्यापैकी नव्हता म्हणजे गुन्हा छोटा होता असे नाही. कारण खून हा खूनच असतो.
आलिया दिसली हत्तींच्या शिकारीची चौकशी करताना
'पोचर'च्या पहिल्या झलकमध्ये, आलिया भटच्या व्हॉईसओव्हरनंतर कॅमेरा फिरतो आणि जमिनीवर हत्तीच्या मृतदेहाच्या खुणा आणि रक्ताचे डाग दिसतात. 'पोचर'ची पहिली झलक शेअर करण्यासोबतच आलियाने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले की 'जागरूकतेच्या व्हिडिओसाठी मी जंगलात एका दिवसापेक्षा कमी वेळ घालवला, पण तरीही मला खूप त्रास झाला. मर्डर इज मर्डर...आणि रिची मेहता आणि अप्रतिम कलाकारांच्या नजरेतून तुम्ही संपूर्ण कथा पाहण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, 'पोचर' मालिका २३ फेब्रुवारी २०२४ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.