बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासह सात लोकांवर फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाक्षीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरादाबाद येथे राहणा-या प्रमोद शर्माने सोनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रमोद शर्मा हा इंडियन फॅशन अॅण्ड ब्युटी अवार्ड्सचा मालक आहे.प्राप्त माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत इंडिया फॅशन अॅण्ड ब्युटी अवार्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या अवार्ड्स शोसाठी सोनाक्षीला बोलवण्यासाठी टॅलेंट फुलआॅन कंपनीचा संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्सीड एंंटरटेनमेंटशी संपर्क साधण्यात आला होता. या कंपनीच्या माध्यमातून सोनाक्षीला एकूण २८ लाख १७ हजार रूपये देण्यात आले. संबंधित कंपनीला कमिशनपोटी पाच लाख देण्यात आले. यानंतर २१ जूनला अभिषेकच्या कंपनीने प्रमोद शर्मासोबत लेखी करारही केला. या करारापश्चात दिल्लीला होणा-या या इव्हेंटमध्ये सोनाक्षी येणार अशी होर्डिंगही लागलीत. मात्र ३० सप्टेंबरला ऐन कार्यक्रमाच्या दिवशी सोनाक्षीने आयोजकांना १० वाजताची फ्लाईट रद्द करून सव्वा तीनची फ्लाईट बुक करण्यास सांगितले. आयोजकांनी ६४ हजारांत दोन तिकिटे बुकही केलीत. पण याऊपरही सोनाक्षी या शोला आली नाही. सोनाक्षी न आल्याने गर्दीने कार्यक्रमात गोंधळ घातला. तोडफोड केली. आयोजकांना यामुळेही नुकसान सोसावे लागले. काल शनिवारी आयोजकांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.अद्याप सोनाक्षी या प्रकरणावर बोललेली नाही. ती काय बोलते ते पाहूच.
सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा आरोप, वाचा काय आहे प्रकरण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 2:13 PM
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासह सात लोकांवर फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाक्षीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत इंडिया फॅशन अॅण्ड ब्युटी अवार्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या अवार्ड्स शोसाठी सोनाक्षीला एकूण २८ लाख १७ हजार रूपये देण्यात आले.