बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोंडीवर ते अगदी परखडपणे त्यांची मतं मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी ‘चांद्रयान ३’बाबत केलेलं ट्वीट व्हायरल झालं होतं. या ट्वीटमधून त्यांनी ‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. ‘चांद्रयान ३’बद्दल केलेल्या या ट्वीटमुळे प्रकाश राज अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, हिंदू संघटनेच्या नेत्यांनी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बानहट्टी पोलीस स्थानकांत ही तक्रार करण्यात आली आहे. यासंबंधी प्रकाश राज यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही हिंदू संघटनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
“ते मला भिकारी समजले आणि...”, ‘ताली’ फेम मराठी अभिनेत्रीने शेअर केला शूटिंगदरम्यानचा ‘तो’ प्रसंग
प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं?
प्रकाश राज ट्वीटमध्ये चहाची किटली घेतलेल्या एका माणसाचा फोटो शेअर केला होता. या फोटोला त्यांनी 'ब्रेकिंग न्यूज! हे बघा विक्रम लँडरने पाठवलेली चंद्राची पहिली झलक. वॉव!' असं म्हटलं होतं. प्रकाश राज यांच्या या ट्वीटमुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. या ट्वीटनंतर प्रकाश राज यांनी पुन्हा ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. हे ट्वीट ‘चांद्रयान ३’ची खिल्ली उडवणारं नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. तसंच, या ट्वीटमागील विनोदाचा संदर्भही त्यांनी सांगितला होता.
ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान करणं भोवलं; भाजपाच्या विजकुमार गावितांना महिला आयोगाची नोटीस
“द्वेष फक्त द्वेष पाहतो. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ देत होतो. आमचा केरळ चहावाला साजरा करत होतो. ट्रोलर्संनी कोणता चहावाला पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर तुम्हीच एक विनोद आहात”, असं ते म्हणाले होते.