FIR Against Rakhi Sawant: या ना त्या कारणानं सतत चर्चेत राहणारी ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. झारखंडमधील आदिवासींची मुख्य संघटना असलेल्या केंद्रीय सरना समितीने राखीविरोधात रांचीमधील एससी-एसटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. राखीने आदिवासींच्या कपड्यांची खिल्ली उडवत, त्यांच्या भावना दुुखावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरणराखी सावंतचं ‘मेरे वरगा’ हे नवं गाणं रिलीज होणार आहे. या गाण्याच्या एका प्रमोशनल इव्हेंटमधील राखीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत राखी न्यूड कलरचा मल्टी लेअर्ड मिनी स्कर्ट, स्टोन स्टडेड बिकिनी टॉप व डोक्यावर पंखा पंखांचा मुकूट परिधान केला आहे. हा माझा ‘ट्रायबल लुक’ असल्याचं ती म्हणतेय. यावर समितीने आक्षेप नोंदवला आहे. या व्हिडीओतील राखीनं बेली डान्ससाठीचा अश्लिल वेश परिधान केला आहे आणि त्याचं वर्णन आदिवासी पोशाख असं केल्याचा दावा केंद्रीय सरना समितीचे अध्यक्ष अजय तिर्की यांनी केला आहे. आदिवासी समाजाची स्वत:ची एक गौरवशाली परंपरा आहे आणि राखीने या संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
बेली डान्ससाठी अश्लील वेश परिधान करून त्याचा संबंध ती आदिवासी समाजाशी जोडत आहे. हे आक्षेपार्ह असून आदिवासींचा अपमान आहे. आम्ही तिच्याविरूद्ध एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाईची विनंती केली आहे, असं त्यांनी सांगितलं. राखीने आदिवासी समाजाची माफी वागावी. ती जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही तिचा विरोध असाच चालू ठेवू, असा इशाराही त्यांनी दिला. तिने आमच्या लेकीसूनांचा अपमान केला आहे. आमच्या संस्कृती व परंपरेची खिल्ली उडवली आहे, असंही ते म्हणाले.