-रवींद्र मोरे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़, तेलंगाणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या निकालानंतर देशात २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीस वेग आला आहे. या निवडणुकीचे परिणाम बऱ्याच गोष्टींनी ठरविले जातील, मात्र याअगोदर काही राजकारणावर आधारित चित्रपटांमुळे बरीच राजकीय चर्चा रंगताना दिसेल. यात बहुतांश नेत्यांचा बायोपिक आहे तर काही राजनीतिक घटनांवर आधारित चित्रपटही आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि राजकीय वर्तुळात काय विशेष करतील हे आता आगामी काळच ठरवेल.
* द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टरसर्वप्रथम चर्चा करुया माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची. यात मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यास विरोध होताना दिसत आहे. विरोधकांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर हा चित्रपट आणला असून यात अनेक आक्षेपार्ह दृष्य असल्याचे म्हणत कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे. या अगोदरही या चित्रपटाचे बरेच पोस्टर्स रिलीज झाले आहेत.
* बाटला हाउस दिग्दर्शक निखिल आडवाणी दिल्लीच्या बाटला हाउस एनकाउंटरवर आधारित चित्रपट बनवण्याच्या आणि रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात अगोदर सैफ अली खानला घेण्यात आले होते, मात्र आता त्याच्या जागेवर जॉन अब्राहम आहे. २००८ मध्ये हा विवादित एनकाउंटर होणार होता. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेवर होते. मीडिया रिपोर्टनुसार निखिल अगोदर ऑपरेशन ब्लू स्टारवर चित्रपट बनवू इच्छित होते, मात्र त्यांना धमक्या मिळत होत्या, त्यामुळे हा चित्रपट बनू शकला नाही.
* द ताशकंद फाइल्ससोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह राहणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनावर ‘द ताशकंद फाइल्स’ हा चित्रपट बनविला आहे. हा चित्रपट यंदा रिलीज होणार आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाच्या रिलीजवेळी वाद होऊ शकतो. यात त्यांनी तत्कालीन कॉँग्रेसी सत्तेला काही कठीण प्रश्न विचारले आहेत.
* एनटी रामाराव (बायोपिक)फक्त बॉलिवूडच नव्हे तर साउथ चित्रपटसृष्टीदेखील राजनीतिक बायोपिक आणण्यात मागे नाही. अभिनेता आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा बायोपिक गेल्या वर्षी उपराष्ट्रपति एम. वैंकेया नायडू यांनी लॉन्च केला होता. बॉलिवूडमध्ये ‘गब्बर इज बॅक’ बनविणारे कृष या चित्रपटास डायरेक्टर करत आहे. यात एनटीआर यांचा मुलगा बालकृष्ण वडिलांची भूमिका साकारणार आहे.