प्रदूषणविरहीत सेलिब्रेटींची दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 7:08 PM
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा व आनंद साजरा करण्याचा सण. सर्वांनाचा या उत्सावची उत्सुकता लागलेली असते. सेलिब्रेटीदेखील आपल्या कामाच्या वेळा ...
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, सुखाचा व आनंद साजरा करण्याचा सण. सर्वांनाचा या उत्सावची उत्सुकता लागलेली असते. सेलिब्रेटीदेखील आपल्या कामाच्या वेळा सांभाळून हा सण जल्लोषात साजरा करत असतात. दिवाळीत कमी आवाजाचे फटाके फोडा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असे सांगते आहेत हे सेलिब्रेटी... पहाटेपासून सुरू होते दिवाळीचे सेलिब्रेशनविद्या बालन : माझी दिवाळी साजरी करण्याची पद्धत थोडी बदलली आहे. पहाटे साडेचार वाजल्यापासून आमची दिवाळी सुरू होते. सकाळी देवदर्शन आटोपून आम्ही मिठाई तयार करतो. दिवसभर नातलगांच्या भेटीगाठी आणि सायंकाळी मित्रांसोबत गेटटुगेदर हा आमचा दरवर्षी दिवाळीचा ठरलेला कार्यक्रम असतो. दिवाळीला कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्या असे मी माझ्या फॅन्सना नक्कीच सांगेन. पारंपरिक पद्धतीने दिवाळीचे सेलिब्रेशनविवेक ओबेरॉय : दिवाळीचा सण जीवन प्रकाशमान करणारा असतो. या सणाला प्रत्येकाचे जीवन आनंदाने उजळून निघतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पारंपरिक पद्धतीने मी दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणार आहे. फटाके फोडताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी आणि पर्यावरण रक्षण करण्यासाठी कमीत कमी फटाके फोडावेत असा मी संदेश सगळ्यांना देईन. मुलाची पहिली दिवाळी मनीष पॉल : दिवाळीचे माझ्या जीवनात विशेष स्थान आहे. कारण दिवाळीला कुुटुंबातील सगळ्या सदस्यांची आणि मित्रांची भेट होते. यावेळी तर माझ्या मुलाची पहिली दिवाळी आहे. यामुळे हा सण माझ्यासाठी खास आहे. दिवाळीत सर्वांनी फटाके सावधानपूर्वक वाजवावेत असे मी आवर्जुन सांगेन. आईच्या हातच्या करंज्यांना मिस करणारकार्तिक आर्यन : या दिवाळीला मी आईच्या हातच्या करंज्या आणि तिने सजविलेले घर, रोशनाई हे सगळे मिस करणार आहे. मी माझ्या ‘अतिथी इन लंडन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने मी दिवाळी सेटवरच सेलिब्रेट करणार आहे. आवाज कमी करणारे फटाके फोडादेव जोशी (बालवीर) : मी यंदा दिवाळी गुजरातमध्ये आपल्या कुुटुंबासोबत साजरी करणार आहे. दिवाळीत पारंपरिक वस्त्रे परिधान करून दिवाळीची मजा लुटण्यात काही वेगळीच मजा असते. लोकांनी कमीत कमी आणि आवाज न करणारे फटाके वाजवावेत अशी मी माझ्या चाहत्यांना विनंती करेन. प्रदूषणविरहित दिवाळीचा मानसप्रियल गौर (इच्छा प्यारी नागीन) ः मी ही दिवाळी गुजरातमध्ये आपल्या कुटुंबासोबत साजरी करणार आहे. ही दिवाळी माझ्यासाठी खास आहे कारण 5 तारखेला माझा वाढदिवस असल्याने आमच्याकडे डबल सेलिब्रेशन आहे. या दिवाळीला फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा असे मी सगळ्यांना सांगेन. आमिरच्या घरी पार्टीचे आयोजनआमिर खान :दंगलचा ट्रेलर आणि दिवाळी एकत्र आल्याने आमिरसाठी ही दिवाळी खास आहे. तो पारंपरिक पद्धतीने दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करणार आहे. आमिरने आपल्या घरी मित्रांसाठी खास पार्टीचे आयोजन केले असल्याचे कळतेय. सगळा वेळ मुलांसाठीहृतिक रोशन : काबिलचा ट्रेलर लाँच करून हृतिकने आपल्या चाहत्यांना दिवाळीची भेट दिली आहे. तो आपली दिवाळी आपल्या मुलांसोबत साजरी करणार आहे. आपला जास्तीत जास्त वेळ तो मुलांसोबत घालवू इच्छित असल्याने त्याने त्यानुसारच कामाचे शेड्युल आखले आहे. दिवाळी कुटुंबियांसोबत साजरी करणार दीपिका पादुकोण : दीपिका आपल्या कुटुंबासोबत बेंगलुरू येथे दिवाळी साजरी करणार आहे. दीपिका म्हणते, दिवाळी हा आनंदाचा, सुखाचा, दिव्यांचा सण आहे. ही दिवाळी माझ्यासाठी विशेष आहे. कारण मी आई-वडील, बहिणीसोबत दिवाळी साजरी करणार आहे. पण मला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालविता येणार नाही. कारण लवकरच पद्मावतीची शूटिंग सुरू होणार आहे. दिवाळी चित्रपटाच्या टीमसोबत साजरी करणारफरहान अख्तर : फरहान आपली दिवाळी रॉक आॅनच्या टीमसोबत साजरी करणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीला तो ‘रॉनआॅन 2’च्या प्रमोशनात व्यग्र असणार आहे. रॉक आॅनच्या टीमसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तो उत्सुक आहे. दिवाळीसाठी घेतली खास सुट्टीटायगर श्रॉफ : टायगर आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहे. टायगर सध्या मुन्ना मायकलची शूटिंग करत असून कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता यावी यासाठी त्याने खास नियोजन केले आहे. लक्ष्मीपूजनाला तो वडील जॅकी, आई आयेशा आणि बहीण क्रिश्ना यांच्यासोबत घरी पूजा करणार आहे. वेळाचे नियोजन करून साजरी करणार दिवाळी श्रद्धा कपूर : श्रद्धाची दिवाळी यंदा रॉकआॅन 2च्या टीमसोबत साजरी होणार आहे. मात्र दिवाळीच्या दिवशी तिने आपला काही वेळ आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवला आहे. ती काळी वेळ तरी नातलग आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणार आहे. आई-बहिणीसोबत दिवाळी साजरा करण्याचा आनंदक्रिती सेनन : क्रिती तिचा आगामी चित्रपट ‘बरेली की बर्फी’ याचे लखनौमध्ये शूटिंग करीत आहे. मात्र दिवाळीला ती आपल्या कुटुंबासोबत असेल. मुंबईत ती एकटी राहत असल्याने ती नेहमी आपल्या बहिणीला खूप मिस करते. यावेळी ती दिवाळीला आपल्या आई व बहिणीसोबतच असणार आहे. यंदाची दिवाळी चंदिगडमध्येयामी गौतम : काबिलमध्ये हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत असणाऱ्या यामीसाठी ही दिवाळी खास आहे. यामी आपल्या कुुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी चंदिगडला रवाना झाली आहे. ती आपल्या आई-वडील आणि बहिणींसोबत दिवाळी साजरी करणार आहे. यासाठी तिने काबिलच्या टीमकडून खास परमिशन घेतले आहे. दिवाळीसाठी खास लंडनला जाणारराधिका आपटे : अभिनेत्री राधिका आपटेने दिवाळीसाठी लंडनचे तिकीट बूक केले असून ती आपल्या नवऱ्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. दिवाळी करणार सेटवरच साजरी राजकुमार राव : राजकुमार राव आपली दिवाळी त्याच्या आगामी ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या टीमसोबत साजरी करणार आहे. राजकुमार दोन चित्रपटात बिझी असल्याने त्याला दिवाळी सेटवरच साजरी करावी लागणार आहे. ही दिवाळी संजयसाठी खाससंजय दत्त : संजयसाठी ही दिवाळी स्पेशल आहे असेच म्हणावे लागेल. कारण येरवडा जेलमधून बाहेर आल्यावर त्याची ही पहिली दिवाळी आहे. मान्यता, तसेच दोन मुलं आणि बहिणीसोबत तो दिवाळी साजरी करणार आहे. रितेश सिधवानी : ‘रॉक आॅन 2’चा निर्माता रितेश सिधवानी दिवाळीच्या वेळी जंगी पार्टी आयोजन करतो. दिवाळीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व पार्टींमध्ये रितेशची पार्टी सर्वांत चांगली असल्याचे मानले जाते. यंदादेखील त्याने खास पार्टीचे आयोजन केले आहे