मणिरत्नम (Maniratnam) यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan ) या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ति, तृषा कृष्णन यांच्या अभियनायनं सजलेल्या या ग्रँड पीरियड सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई केली आहे. 2022 मधील हा कॉलिवूडचा सर्वात मोठा सिनेमा बनला आहे.पहिल्या दिवशी ‘पोन्नियिन सेल्वन 1’ने वर्ल्डवाईड 80 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. भारतात पहिल्या दिवशी या चित्रपटाने 44.04 कोटींचा गल्ला जमवला. सर्वाधिक कमाई तामिळ व्हर्जनने केली. हिंदी व्हर्जन मात्र फार कमाल दाखवू शकला नाही. ओपनिंग डेला हिंदी प्रेक्षकांनी चित्रपटाला फार प्रतिसाद दिला नाही. हिंदी व्हर्जनने शुक्रवारी रिलीजच्या दिवशी फक्त 2 कोटींचा बिझनेस केला.तामिळनाडूत या चित्रपटाने बंपर कमाई केली. सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या. ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबालन यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, तामिळनाडूत पहिल्या दिवशी ‘पोन्नियिन सेल्वन 1’ने 25.86 कोटी कमावले.विदेशात या चित्रपटाने 34.25 कोटींची कमाई केली.
मोडला ‘विक्रम’चा विक्रम ‘पोन्नियिन सेल्वन 1’ने कमल हासन यांच्या ‘विक्रम’चा ओपनिंग डे कलेक्शनचा रेकॉर्ड मोडीत काढला. विक्रमने पहिल्या दिवशी देशात 33 कोटी व वर्ल्डवाईड 54 कोटींचा बिझनेस केला होता.
हिंदीत ‘विक्रम वेधा’ने दिली मात ‘पोन्नियिन सेल्वन 1’च्या हिंदी व्हर्जनला पहिल्या दिवशी फार काही प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटासोबतच हृतिक रोशन व सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ रिलीज झाला. पहिल्या दिवशी विक्रम वेधाने 10.50 कोटींचा बिझनेस केला. याऊलट ‘पोन्नियिन सेल्वन 1’ला केवळ 2 कोटींवर समाधान मानावं लागलं. ‘पोन्नियिन सेल्वन 1’चा एकूण बजेट 500 कोटी रूपये आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 1’ला चांगली ओपनिंग मिळाली आहे. शनिवारी व रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.