15 दिवसांपूर्वी गुपचूप लग्नबेडीत अडकलेल्या, बॉलिवूडच्या 'या' जोडप्याचा पहिला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 3:03 PM
या डिनर पार्टीत सुमोना चोक्रवती, अमृता अरोरा आणि दिग्दर्शक राजीन राय यानी हजेरी लावली होती.
काही दिवसांपूर्वी पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहसोबत सीक्रेट मॅरेज केले. पूजाने गत 4 जुलैला दिल्लीत आर्य पद्धतीने विवाह केला. आणि यानंतर आठवडाभराने नोंदणी पद्धतीने विवाह केल्याच्या खुलासा तिने केला होता. लग्नाच्या 15 दिवसानंतर पूजा आणि नवाबने त्याच्या जवळच्या मित्र-परिवारासाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. लग्नानंतर पहिल्यांदा हे कपल सार्वजनिक ठिकाणी एकत्र समोर आले.
या दरम्यान पूजाने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला होता. तसेच हातात लाल रंगाचा चुडासुद्धा घातला होता. पूजाच्या डिनर पार्टीत सुमोना चोक्रवती, अमृता अरोरा आणि दिग्दर्शक राजीन राय यानी हजेरी लावली होती.
पूजा आणि नवाब एकमेकांना 5 महिने डेट करत होते त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. एका मुलाखती दरम्यान नवाबलाच पार्टनर म्हणून का निवडले, असे विचारले पूजा विचारला असता ती म्हणाली की, ''नवाबला भेटल्यानंतर हीच ती व्यक्ती आहे, जिच्यासोबत मी अख्खे आयुष्य घालवू शकते, असे मला वाटले. आमचे प्रोफेशन एक आहे, म्हणून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण एका कॉमन फ्रेन्डने आमची भेट घडवून आणली. यावर्षी फेब्रुवारीत आम्ही भेटलो. या पहिल्याच भेटीत आमच्यातील अनेक गोष्टी समान असल्याचे आम्हाला जाणवले. एकमेकांशी न बोलताही आम्ही एकमेकांबद्दलच्या अनेक गोष्टी समजू शकतो. पहिल्या भेटीनंतर एकदिवस नवाब मला एअरपोर्टवर घ्यायला आला. खरे तर त्याचदिवशी तो मला प्रपोज करणार होता. पण तो इतका नर्व्हस झाला की, त्याने तो प्लान रद्द केला. यानंतर दिल्लीत त्याने मला प्रपोज केले. पुढे आमचे कुटुंब एकमेकांना भेटले.''
42 वर्षांच्या पूजाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी लॉस एंजिल्समधील एका बिझनेसमॅनसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र 2011 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. पूजा यावरही बोलली. तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. दुसºया देशात या वाईट काळाला मी एकटीने तोंड दिले. त्या काळात मला मोठा धडा मिळाला. आयुष्य काळासोबत तुम्हाला अनेक गोष्टी शिकवते, असे ती म्हणाली.