अभिनेत्री पूजा बेदीची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. पूजा बेदीने सांगितले की, गोव्यात रजिस्टर्ड असलेली तिच्या ई-कॉमर्स वेबसाईट काही लोकांनी हॅक केली आहे. खंडणी न दिल्यास वेबसाईटवर ड्रग्स विकण्याची धमकी देण्यात आली आहे. गोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली मात्र कारवाई न झाल्यामुळे आता पूजाने गोव्याच्या डीजीपींकडे मदत मागितली आहे.
पूजा बेदी अडचणीत सापडलीपूजा बेदीने सांगितले की, वेबसाईट हॅक झाल्यानंतर गेल्या आठवड्यात तिने गोवा पोलिसांच्या सायब्रर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली होती, पंरतु रविवारी रात्री पुन्हा हॅकिंगची घटना घडली.
पूजा बेदीने डीजीपींकडे मागितली मदतपूजा बेदीने गोव्याच्या डीजीपींना टॅग करत एक ट्विट केले आहे. यात तिने लिहिले, 'माझी ई-कॉमर्स वेबसाईट हॅप्पी सोल डॉट इन काल रात्री पुन्हा एकदा हॅक झाली आहे. यावेळी खंडणी न दिल्यास ते माझ्या वेबसाईटवर ड्रग्स विकणार आहेत. गेल्या आठवड्यात मी ओल्ड गोवा पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एफआरआय दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.' पूजाने हॅकर्सच्या मेलचा स्क्रिनशॉर्ट देखील शेअर केला आहे.
एसपी क्राईम शोभित सक्सेना म्हणाले, गेल्या आठवड्यात झालेल्या हॅकिंगची घटनचे निवारण करण्यात आले होते. पूजा बेदीने पुन्हा दाखल केलेल्या तक्रारीचा तपास सुरु करण्यात आला आहे.