पूजा भटने एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. तिने दिल है के मानता नही, सडक, जुनून, बॉर्डर, जख्म यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत तिने अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले आहे. पूजा अगदी हूबेहूब तिच्या आईसारखीच दिसते. पूजाने सोशल मीडियावर तिच्या आई व भावासोबतचा फोटो शेअर केले आहेत.
पूजाने आपल्या आईसोबतचे बरेचसे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती अगदी आईसारखी दिसते.
पूजा आणि राहूल ही महेश भट व त्यांची पहिली पत्नी किरणची मुलं आहेत. महेश भट यांनी वीसाव्या वर्षी १९६८ साली लॉरेन ब्राईटसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांचं नाव बदलून किरण ठेवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश भट यांचं अभिनेत्री परवीन बाबींसोबत अफेयर असल्याचं समजल्यावर किरण यांच्यासोबतचं नातं संपुष्ठात आलं.