महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट 49 वर्षांची झाली आहे. 24 फेब्रुवारी 1972 रोजी मुंबईत जन्मलेली पूजा भट्ट सुरुवातीपासूनच वादात होती. 1989 साली पूजाने डॅडी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. वडील महेश भट्ट यांनीच या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळी पूजा फक्त 17 वर्षांची होती. या सिनेमात अगदी बोल्ड अंदाजा पूजा दिसली होती.
या सिनेमानंतर 'दिल है कि मानता नहीं', 'सड़क', 'जानम', 'सातवाँ आसमान', 'जुनून', 'तड़ीपार', 'क्रांति क्षेत्र', 'नाराज', 'गुनहगार', 'हम दोनों', 'अंगरक्षक', 'चाहत', 'तमन्ना', 'बॉर्डर', 'कभी न कभी', 'अंगारे', 'जख्म और सनम तेरी कसम' सारखे सुपरहिट सिनेमे तिने दिली. पूजा शेवटची 'सड़क 2' मध्ये झळकली होती.
त्यावेळी पूजा भट्टचे वडिल महेश भट्टसोबतच्या एका फोटोमुळे वादात सापडली होती. वडील महेश भट्टसोबतचा किस करतानाचा फोटो चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी या दोघे बाप लेकींवर प्रचंड टीका करण्यात आली होती. महेश भट्ट यांना जीवे मारण्याचीही धमक्या मिळायच्या. अनेकदा दोघांनाही वादग्रस्त गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्यांचा हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि त्यात आपली बाजु मांडण्याचा प्रयत्न केला.
आणि त्याचवेळी धक्कादायव विधान करत त्यांनी आणखी एक वाद ओढावून घेतला होता. त्यांनी थेट आपल्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ''पुजा भट्ट मुलगी नसती, तर मी तिच्याबरोबर लग्नही केले असते''. असे विधान करताच भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या विधानानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती. भारतीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम मेहश भट्ट करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
महेश भट यांनी 20व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना 2 मुलं आहेत. पुजा आणि राहुल. मात्र लॉरेन आणि महेश यांचं हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. याला कारण होतं महेश यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले आणि आपल्या पत्नीकडे परत आले.
सोनी राजदान यांच्यापासून महेश यांना २ मुली आहेत. आलिया आणि शाहिन. आलियानं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये स्थान मिळवलं आहे. महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या फोटोवर उठलेल्या वादळाला बरेच वर्ष लोटले असले तरी आजही तो फोटो आठवताच संतप्त प्रतिक्रीया उठतातच. किरण यांच्याकडे परतल्यानंतरही महेश आणि किरण यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाही. ज्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केल.