सौंदर्याच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टक्कर देणारे बॉलिवूडचे नाव म्हणजे पूनम ढिल्लन. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने मिस यंग इंडिया स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले आणि विजेतेपद पटकावले, नंतर फेमिना मिस इंडिया बनली आणि रातोरात प्रसिद्ध झाली.. 'त्रिशूल' सिनेमातून तिने डेब्यू केलं होतं. पण तिला ओळख मिळाली ती 'नूरी' सिनेमातून. कमी वयातच पूनम बॉलिवूडमध्ये आली होती. त्यानंतर ती थिएटर आणि मालिकांमध्येही दिसली. ती तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत होती.
८०-९० च्या काळात पूनमने तेव्हाच्या सर्वत सुपरस्टार हिरोसोबत काम केलं. पूनमने अमिताभ बच्चनपासून ते सनी देओल आणि कमल हसन यांसारख्या हिरोसोबत काम केलं. पूनमचं नाव बॉलिवूडच्या अनेक दिग्दर्शकांसोबत जुळलं होत. सर्वातआधी तिचं नाव दिग्दर्शक रमेश सिप्पीसोबत जुळलं होतं. पण हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर तिच्या आणि दिग्दर्शक यश चोप्राच्या अफेअरची खूप चर्चा झाली. त्यानंतर ती राज सिप्पीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
मीडिया रिपोर्टनुसार, पूनम ढिल्लोचं राज सिप्पीवर खूप प्रेम होतं. राज सिप्पी आधीच विवाहित असल्याने ते लग्न करू शकले नाहीत. राजने पूनमवर प्रेम केलं, पण आपल्या पत्नी घटस्फोट देऊन दुसरं लग्न करण्याचं साहस तो दाखवू शकला नाही. रूपेरी पडद्यावर प्रेम कहाणीचा इतिहास रचणाऱ्या पूनमचं प्रेम अधुरं राहिलं. अशात पूनमच्या आयुष्यात आला अशोक ठाकेरिया.
पूनम ढिल्लो आणि अशोक ठाकेरिया जवळ आले तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय केला. पूनमच्या जवळच्या लोकांनी तिला खूप समजावलं.. पण तिने काही ऐकलं नाही आणि अशोकसोबत लग्न केलं. लग्नाला दोनच वर्षे झाली असताना त्यांच्यात वाद होऊ लागले होते अशोकच्या अनैतिक संबंधाच्या बातम्या येऊ लागल्याने पूनम चिंतेत होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार पूनमने तिचा पती अशोकला धडा शिकवण्यासाठी ती दुसऱ्या पुरूषांकडे अट्रॅक्ट झाली. मीडिया रिपोर्टनुसार, हॉंगकॉंगचा बिझनेसमन किकूसोबत तिचं अफेअर सुरू होतं.
पूनम ढिल्लो आणि अशोक ठाकेरियाने ९ वर्षाचा संसार मोडत १९९७ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नंतर पूनमने लग्न केलं नाही. तसेच आपल्या मुलांची पालन पोषण स्वत: केलं.