Join us

पूनम पांडे पुन्हा अडचणीत! १०० कोटींचा मानहानीचा दावा, संपूर्ण प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:48 IST

पूनम पांडेविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा कोणी दाखल केलाय? (Poonam Pandey)

बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या (Poonam Pandey) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. काही दिवसांपुर्वी मृत्युचा बनावट दावा केल्याचं प्रकरण पूनम पांडेची पाठ सोडत नाही, असंच चित्र दिसतंय. पूनमला हे प्रकरण पुढेही चांगलंच भोवणार अशीच चिन्हं दिसत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पूनम पांडे आणि तिचा पती सॅमवर १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आलाय. 

News 24 ने दिलेल्या माहितीनुसार,  सोशल मीडिया स्टार फैजान अन्सारीने पूनम विरोधात मानहानीचा खटला केला आहे. त्याने पूनम पांडेवर महिलावर्ग आणि तिच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. फैजान हा मूळचा मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून तो मुंबईत राहत होता. पूनम पांडेविरुद्ध त्याने मुंबई पोलिसांकडेही तक्रार केली आहे. पण पूनम ही उत्तर प्रदेशातील कानपूरची रहिवासी आहे. त्यामुळे फैजानने आता तिच्या गावी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पूनम पांडेवर FIR नोंदवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे. युपीमधील फीलखाना पोलिस स्टेशनच्या एसएचओला या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक, पूनम पांडेने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने स्वतःचा मृत्यू झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. त्यामुळेच तिच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आल्याचं समजतंय.

 

टॅग्स :पूनम पांडेबॉलिवूड