Join us

पूनम पांडेने पाकिस्तानी प्रेक्षकांना दिले सडेतोड उत्तर, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:07 IST

पूनम पांडेने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओतून थेट तिने पाकिस्तानच्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरला आहे. 

ठळक मुद्देपूनम पांडेने तर हा प्रोमो पाहून एक खतरनाक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. चहाच्या कपवर समाधान का मानायचे तुम्ही डबल डी घ्या अशा आशयाचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

क्रिकेट मॅचेसची पूनम पांडे किती मोठी फॅन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. भारताने क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तर मी कपडे उतरवेन असे म्हणत 2011 च्या वर्ल्ड कप मॅचच्यावेळी पूनमने फुकटची पब्लिसिटी मिळवली होती आणि आता तिने तिच्या ट्विटरला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

पूनम पांडेने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओतून थेट तिने पाकिस्तानच्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरला आहे. 

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मॅच या रविवारी म्हणजेच १६ जूनला होणार असून या मॅचची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये देखील या मॅचची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या मॅचच्या आधी पाकिस्तानमध्ये या मॅचच्या संबंधित एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. यात आपल्याला विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती दिसत असून त्यांची या व्हिडिओद्वारे खिल्ली उडवण्यात आली आहे. भारताने बनवलेल्या मौका मौका या जाहिरातीला प्रत्युत्तर म्हणून ही जाहिरात बनवण्यात आलेली आहे. 

पाकिस्तानने बनवलेला हा प्रोमो नेटिझन्सना अजिबात आवडला नसून ट्विटरवर या व्हिडिओच्या विरोधात अनेक कमेंट केले जात आहेत. पूनम पांडेने तर हा प्रोमो पाहून एक खतरनाक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. चहाच्या कपवर समाधान का मानायचे तुम्ही डबल डी घ्या अशा आशयाचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर पाकिस्तानी फॅन्सनी देखील तिला विचित्र कमेंट दिले आहेत. त्यांनी विराट कोहली, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो शेअर करून पूनमच्या व्हिडिओत काय आहे हे कोहली समजवताना...

 

तसेच विराटचा एक फोटो शेअर करून पूनम पांडेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी असणार प्रतिक्रिया... असे लिहिले आहे. पूनमचा हा व्हिडिओ केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्ये देखील हिट झाला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

 

 

 

टॅग्स :पूनम पांडेपाकिस्तानअभिनंदन वर्धमान