Join us  

Poonam Pandey Video: अरे देवा... बॅकलेस टॉप अन् शॉर्ट स्कर्ट घालून पाणीपूरी खायला पोहोचली पूनम पांडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 8:22 PM

पूनम पांडे नेहमीच हॉट अंदाजामुळे चर्चेत असते

Poonam Pandey Video: आपल्या बोल्ड, बिनधास्त आणि हटके स्टाइलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मॉडेल पूनम पांडे कधी काय करेल याचा भरोसा नाही. प्रत्येक वेळी ती असे काही प्रकार करते की तिचा व्हिडिओ सहज व्हायरल होतो. सध्यादेखील तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. पूनम पांडे मुंबईत वास्तव्यास आहे. काही कामानिमित्त ती घराबाहेर पडते तेव्हा तिचे कपडे फारच रिव्हिलिंग असतात हे अनेकदा दिसून आलं आहे. तशातच सध्याच्या व्हिडीओत ती आपल्या घरातून पाणीपुरी खायला गेली असतानाची क्लिप व्हायरल झाली असून त्यात तिने अतिशय रिविंलिंग असा बॅकलेस शॉर्ट टॉप घातला असून तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

मुंबईत पूनम पांडे आपल्या घरातून पाणीपूरी खायला बाहेर पडली. त्यावेळी तिची स्टाइल आणि तिचे कपडे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. यावेळी पूनम पांडेने फारच रिविलिंग कपडे परिधान केले होते. तशातच समोर मीडियाचे कॅमेरे आल्यानंतर तिने अधिकच अदा दाखवल्या. तिचे संवाद आणि पाणीपूरीचा आस्वाद घेत असताना पूनम पांडे कॅमेऱ्यात कैद झाली. पूनमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा पूनम पांडेचा व्हायरल व्हिडीओ-

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पूनम पांडेने व्हाईट रंगाचा बॅकलेस ब्रा स्टाइल टॉप परिधान केलेला दिसत होता. अभिनेत्रीचा हा टॉप बॅकलेस असून त्याला मागच्या बाजूला केवळ दोन दोऱ्या होत्या. तसेच, पूनमचा हा स्कर्ट डीप नेक टॉप होता. पूनमने या टॉपखाली मिनी स्कर्ट परिधान केला होता. पूनम पांडे काही आठवड्यांपूर्वी कंगना राणौतच्या 'लॉक अप' या रिअँलिटी शोमध्ये दिसली होती. या शोमध्येही अभिनेत्री तिच्या बोल्ड अदा दाखवत होती. पण तिला या शो चे विजेतेपद मात्र मिळवता आले नाही.

टॅग्स :पूनम पांडेसोशल मीडियासोशल व्हायरलबॉलिवूड