Poonam Pandey fan tries to kiss viral video: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेसोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. आता तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक चाहता पूनम पांडेला किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पूनम पांडेच्या या व्हिडिओवर काही सोशल मीडिया चाहते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. तर काही मंडळी पूनम पांडेलात ट्रोल करताना दिसत आहेत. जाणून घेऊया नेमका काय आहे प्रकार.
नक्की काय घडलं?
पूनम पांडेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम पांडे लाल रंगाचा ड्रेस घालून रस्त्यावर उभी आहे. अचानक मागून एक माणूस येतो. त्या माणसाला पाहून पूनम थोडी दचकते. नंतर, तो व्यक्ती तिचा फॅन असल्याचे सांगत आपला फोन काढतो आणि सेल्फी काढू लागतो. सेल्फी घेण्यासाठी पूनम पांडे पोज देतच असते, तितक्यात तो माणूस पूनम पांडेच्या गालावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. पूनम पांडे त्या माणसाला लगेच मागे ढकलते तिथून बाजूला सरकून निघून जाते. नंतर दुसरा एक व्यक्तीदेखील या चाहत्याला मागे ढकलताना दिसतो. पाहा व्हिडीओ-
सोशल मीडिया काय चर्चा?
पूनम पांडेच्या या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे. पूनम पांडे प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी काहीही करू शकते. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, फॅन ओव्हर अँक्टिंग करतोय, ५० रुपये काट लो. तिसऱ्याने तर लिहिले की, आधी मृत्यूचे नाटक, आता तर मर्यादाच ओलांडली.पूनम पांडेसोबत घडलेला हा प्रसंग नेमका खरा की ठरवून घडवून आणलेला, यावर सध्या चर्चा रंगली आहे. मात्र, काही युजर्स या घटनेनंतर या फॅनच्या विकृत मानसिकतेलाही दोष देताना दिसत आहेत.