Join us

'तुमच्यासमोर मोठी बातमी येणार आहे...' पूनम पांडे चाहत्यांना देणार होती सरप्राईज, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 15:06 IST

पूनम पांडेने तीन दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती.

मनोरंजनविश्वातील वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडेच्या (Poonam Pandey) निधनाने खळबळ उडाली आहे. सर्व्हिकल कॅन्सरने तिचं निधन झाल्याचं तिच्या टीमने सांगितलं आहे. यामुळे कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पूनम चाहत्यांना एक सरप्राईज देण्याच्या तयारित होती. तसं तिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र हे सरप्राईज देण्याआधीच तिचं निधन झालं आहे. तिची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पूनम पांडे काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने वेस्टर्न गाऊन घातला होता. ती नेहमीप्रमाणेच तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. शिवाय याच इव्हेंटमध्ये माध्यमांशी बोलताना तिने मुनव्वर फारुकीला बिग बॉस विजेतेपदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान Instant Bollywood या इन्स्टाग्राम पेजने तिच्याशी संवाद साधला. यामध्ये ती म्हणाली, "तुमच्यासमोर एक मोठी बातमी येणार आहे. मला लोकांना सरप्राईज द्यायला प्रचंड आवडतं. जेव्हा त्यांना वाटतं की मी सुधरत आहे तेव्हा तर मला अजूनच असे सरप्राईज द्यायला मजा येते. तर लवकरच एक मोठी बातमी तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. तुम्हीही त्याचा भाग असाल. तुमची काय प्रतिक्रिया असेल हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे."

पूनम पांडेने तीन दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. तिच्याकडे पाहूनही कोणलाही याची कल्पना आली नाही की ती आजारी असेल. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत हळहळ व्यक्त केली आहे. काही जणांना तिच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याचंही वाटत आहे. तर काहींनी आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. पूनमचा हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

टॅग्स :पूनम पांडेसोशल मीडियाबॉलिवूड