Join us

'मी माझ्या आईचं ऐकलं, पण माझ्या लेकीने काय केलं?', सोनाक्षीच्या लग्नावर पूनम सिन्हांची जाहीर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:10 IST

कपिल शर्मा शोमध्ये काय म्हणाल्या पूनम सिन्हा?

'द ग्रेट इंडियन कपिल शो सीजन २' मध्ये नुकतीच सिन्हा कुटुंबाने हजेरी लावली होती. शत्रुघ्न सिन्हा, पत्नी पूनम सिन्हा, सोनाक्षी सिन्हा  (Sonakshi Sinha) आणि तिचा नवरा झहीर इकबाल (Zaheer Iqbal) यांनी शोमध्ये धमाल केली. सोनाक्षीने जहीरशी लग्न केलं तेव्हा तिचे आईवडील नाराज असल्याची खूप चर्चा झाली होती. कपिलच्या शोमध्ये सोनाक्षीच्या आईची नाराजी आता उघड उघड दिसून आली आहे. काय म्हणाल्या पूनम सिन्हा (Poonam Sinha)?

अभिनेत्री सोनाक्षीने जून महिन्यात बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत लग्न केलं. या आंतरधर्मीय विवाहाची सगळीकडेच चर्चा झाली. सोनाक्षीचं कुटुंब लग्नाच्या विरोधात होतं असंही बोललं गेलं. आजकालचे मुलं पालकांची परवानगी घेत नाहीत अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली होती. आता नुकतंच कपिलच्या शोमध्ये पूनम सिन्हा म्हणाल्या, "माझी आईने मला नेहमीच हे शिकवलं की बाळा, त्याच्याशीच लग्न कर जो तुझ्यावर खूप प्रेम करेल. ठिके, ते मी ऐकलं आणि तसं केलंही. पण माझ्या मुलीने काय केलं? हिने त्याच्याशी लग्न केलं ज्याच्यावर ती जास्त प्रेम करते."

हे ऐकताच सोनाक्षी म्हणते, "हा एकंदर वाद योग्यच आहे. कारण जहीरला वाटतं की तो माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला वाटतं मी त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करते. आता हे ठरवणार कोण?"

कपिल शर्मा शोमधील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. काहींनी कमेंट करत लिहिले, 'सोनाक्षीने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली'. तर दुसऱ्याने लिहिले, 'तिचे आईवडील या लग्नामुळे नाराज आहे हे स्पष्ट दिसतंय'.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाजहीर इक्बाललग्नपरिवार