Join us

एली अवराम थिरकणार उर्मिला मातोंडकरच्या ह्या लोकप्रिय गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 8:10 PM

 राजकुमार संतोषी यांच्या चायना गेट चित्रपटातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर चित्रीत झालेले छम्मा छम्मा गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आता हे गाणे पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ठळक मुद्देछम्मा छम्मा गाणे नव्याने रसिकांच्या भेटीलाएली अवराम थिरकणार छम्मा छम्मा गाण्यावर

 राजकुमार संतोषी यांच्या चायना गेट चित्रपटातील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर चित्रीत झालेले छम्मा छम्मा गाणे खूप लोकप्रिय झाले होते. हे गाणे आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहे. आता हे गाणे पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र या गाण्यात उर्मिला ऐवजी अभिनेत्री एली अवराम थिरकताना दिसणार आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये जुनी गाजलेली गाणी नव्याने रिक्रिएट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. छम्मा छम्मा हे गाणे अरशद वारसीचा आगामी चित्रपट फ्रॉड सैंय्या चित्रपटात नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. हे गाणे तनिष्क बागची संगीतबद्ध करणार आहेत. या गाण्यात एली अवरामसोबत अरशद वारसी व सौरभ शुक्लादेखील दिसणार आहेत. या गाण्याला रोमी, अरूण व नेहा कक्कर यांनी स्वरसाज दिला आहे. तसेच या गाण्यात एक्काचे रॅपदेखील ऐकायला मिळणार आहे. या गाण्याचे दिग्दर्शन व कोरियोग्राफी आदिल शेखने केली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाला मुंबईतील स्टुडिओमध्ये सुरूवात झाली आहे.एली या गाण्याबाबत खूपच उत्साही असून ती म्हणाली की, छम्मा छम्मा हे उर्मिला मातोंडकरचे गाणे मला खूप आवडते. जेव्हा मला या गाण्यासाठी टीप्स ऑफिसमधून फोन आला तेव्हा मी खूपच उत्सुक झाले. मला आशा आहे की मी या गाण्यात उर्मिला मातोंडकर सारखीच एनर्जी व अदा सादर करू शकेन.आदिल नुसार, छम्मा छम्मा गाण्याचा रिमेक पाहताना उर्मिला मातोंडकरवर चित्रीत झालेले गाण्याची देखील आठवण येईल. कारण रिमेकमध्ये देखील एलीसोबत बरेच डान्सर नाचणार आहेत. प्रकाश झा प्रोडक्शन प्रस्तुत व ड्रामा किंग एण्टरटेन्मेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली फ्रॉड सैंय्या चित्रपट बनत असून दिशा प्रकाश झा व कनिष्क गंगवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत. सौरभ श्रीवास्तव या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून यात अरशद वारसी, सौरभ शुक्ला व सारा लोरेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १८ जानेवारी, २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अर्शद वारसीउर्मिला मातोंडकर