Join us

पॉर्नोग्राफी प्रकरण: शिल्पाच्या पतीविरुद्ध ‘ED’चीही कारवाई ?; फेमाअन्वये दाखल होणार गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 6:04 AM

राज कुंद्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याआधी ईडीचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत

ठळक मुद्देमाझा मेव्हणा प्रदीप बक्षी हा हॉट शॉट ॲपचा सर्व कारभार पाहतो. हॉटशॉट ॲपचे २० लाख ग्राहक आहेत.हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत पण अश्लील नाहीत

नवी दिल्ली : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती व उद्योजक राज कुंद्रा(Raj Kundra) याला अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या चित्रपट निर्मितीसाठी विदेशातून केलेल्या अर्थव्यवहाराची आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करण्याची शक्यता आहे. राज कुंद्रा याच्यावर फेमा (परकीय चलन विनिमय कायदा) या कायद्यान्वये लवकरच गुन्हा नोंदविला जाईल अशीही चर्चा आहे.

राज कुंद्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्याआधी ईडीचे अधिकारी सध्या या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत असे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी छापा मारला व राज कुंद्राप्रकरणी तिची चौकशी केली. 

शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) म्हणते...

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, हॉटशॉट ॲपशी माझा काहीही संबंध नाही. माझा पती राज कुंद्रा याचा अश्लील चित्रपट बनविण्याशी काहीही संबंध नाही. माझा मेव्हणा प्रदीप बक्षी हा हॉट शॉट ॲपचा सर्व कारभार पाहतो. हॉटशॉट ॲपचे २० लाख ग्राहक आहेत. मढ समुद्रकिनाऱ्यावरील एका बंगल्यात फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकून अश्लील चित्रपट आणि वेबसिरिज बनविणाऱ्यांना अटक केली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांनाही अटक करण्यात आली.

शिल्पा शेट्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, माझा पती राज कुंद्रा हा निरपराध आहे. हॉटशॉट या ॲपवर झळकलेले चित्रपट कामुक आहेत पण अश्लील नाहीत असा दावा शिल्पा शेट्टी हिने एका निवेदनात केला होता.

 

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टीअंमलबजावणी संचालनालय