गेल्या 19 जुलैला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ( Raj Kundra Case) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. अद्यापही राज तुरुंगात आहे. तो तुरूंगात केल्यापासून या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे. राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसकडून ऑफर आल्याचा खुलासा तिने केला आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव मनिषा केळकर (Manisha Kelkar ) आाहे. मनिषा केळकरने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला.
काय म्हणाली मनिषा...? एका कास्टिंग डायरेक्टरने मला ऑफर दिली होती. राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊसचा प्रोजेक्टचा आहे आणि त्यासाठी तुला फोटो आणि व्हिडीओ शूट करायचे आहेत, त्यांनी मला सांगितले होते. राज कुंद्राचं प्रॉडक्शन हाऊस म्हटल्यावर हे एक नावाजलेलं प्रॉडक्शन हाऊस आहे, असे सुरूवातीला मला वाटलं होतं. पण फोटो व व्हिडीओ शूट कशासाठी? असा प्रश्न मी केल्यावर त्यांनी फार काही समाधानकारक उत्तर दिलं नाही. या एकाच कारणाने मी ती ऑफर नाकारली. खरं सांगायचं तर फक्त एखाद्या वेब साईडवर आपले फोटो आणि व्हिडीओ टाकले जाणार हे मला जरा विचित्र वाटलं होतं. त्यांनी साधं फोटोशूट असेल असं सांगितलं होतं.
न्यूडिटीचा वगैरे काहीही उल्लेख नव्हता. पण ज्या नंबरवरून मनिषाला कॉल आला होता त्या मोबाईल नंबरचा तपास केला असता तो नंबर नायजेरियाचा असल्याचं मला कळलं आणि मी थेट नकार कळवला. यानंतर पुन्हा कधीच त्यांचा कॉल आला नाही,’ असं मनिषानं सांगितलं. अशा प्रकरणात अडकायचं नसेल तर सतर्क राहणं गरजेचं असल्याचं देखील ती म्हणाली.मनिषा केळकर हिने अनेक मराठी व हिंदी सिनेमांमध्ये काम केले. ह्यांचा काही नेम नाही, चंद्रकोर, भोळा शंकर या मराठी सिनेमांमध्ये मनिषा झळकली आहे. बंदूक, लॉटरी या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिनं भूमिका साकारल्या आहेत.