सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra )अटक केली. पोर्नोग्राफी प्रकरणात त्याला (Raj Kundra Arrested) अटक करण्यात आली. राज कुंद्रावर मोबाईल अॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असाही आरोप आहे. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजचे व्हॉट्सअॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे.राजने त्याचा नातलग प्रदीप बख्शीसोबत मिळून लंडनमध्ये केनरिन (Kenrin) नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या कंपनीचा राज कुंद्रा अध्यक्ष आहे शिवाय बिझनेस पार्टनरही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज अप्रत्यक्षपणे या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदारही आहे. याच कंपनीच्या माध्यमातून अनेक एजंटला पॉर्न कंटेंट बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले जायचे.
एका व्हॉट्सअॅप ग्रूपच्या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टबद्दल चर्चा व्हायची. ‘H Accounts’ नावाच्या या व्हाट्सअॅप ग्रूपमध्ये पाच लोक होते. यात राज कुंद्राही होता. या ग्रूपवरचे व्हाट्सअॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळेच राज कुंद्राला अटक झाली आहे. एका प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीशी राजने व्हाट्सअप चॅट केले आहेत. यामध्ये राज आणि प्रदीप यांच्यात पॉर्न कंटेंटबद्दल चर्चा झाली होती. यातून होणा-या नफ्यावरसुद्धा व्हाट्सअप चॅट करण्यात आले होत. पॉर्न फिल्ममध्ये काम करणा-या अभिनेत्रींनी किती रक्कम घेतली यावरही या चॅटमध्ये चर्चा झाली होती. तसेच उमेश कामत नावाच्या एका व्यक्तीचासुद्धा यामध्ये समावेश आहे. हा जी केनरीन या कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आहे.