पोस्टर रिलीज! अखेर श्रीदेवीच्या लेकीच्या ‘डेब्यू’चा मुहूर्त ठरला; पाहा, जान्हवी कपूर व ईशान खट्टरची गजब केमिस्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 4:42 AM
श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर बॉलिवूड डेब्यू करणार, अशी कित्येक दिवसांपासून चर्चा होती. प्रेक्षकही जान्हवीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सूक ...
श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर बॉलिवूड डेब्यू करणार, अशी कित्येक दिवसांपासून चर्चा होती. प्रेक्षकही जान्हवीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सूक होते. अखेर जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूची अधिकृत घोषणा झालीच. काल बुधवारी जान्हवी आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या दोघांचा डेब्यू सिनेमा ‘धडक’चे पोस्टर रिलीज झाले. पोस्टर बघता, ही जोडी रिलीजआधीच हिट होणार, असे दिसतेय. जान्हवी तर हुबेहुब आई श्रीदेवीची कार्बन कॉपी असल्यासारखी दिसतेय. ईशानचा चुलबुला अंदाजही बघण्यासारखा आहे. ‘धडक’ हा सिनेमा ‘सैराट’ या अभूतपूर्व गाजलेल्या मराठी चित्रपटाचा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे. करण जोहर हा चित्रपट प्रोड्यूस करतोय. पुढीलवर्षी ६ जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘धडक’चे पोस्टर रिलीज होण्याच्या काही तासआधी धर्मा प्रॉडक्शनकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला गेला होता. यात करण जोहरने दोन नवे चेहरे लॉन्च करण्याची घोषणा केली होती. धर्मा प्रॉडक्शनने याआधी अनेक नव्या चेह-यांना लॉन्च केले आहे. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन यासारख्या अनेकांना धर्मा प्रॉडक्शनने एक नवी ओळख दिली आहे. आता धर्मा प्रॉडक्शन जान्हवी व ईशानच्या रूपात पुन्हा एक नवी जोडी लॉन्च करतयं. या जोडीला प्रेक्षकांचे किती प्रेम मिळते, ते येत्या काळात दिसलेच. चर्चा खरी मानाल तर ‘धडक’चे शूटींग येत्या १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. शूटींग मुंबईतच होईल. जान्हवीचा हा डेब्यू सिनेमा असला तरी ईशानचा तसे पाहता हा डेब्यू सिनेमा नाही. कारण ईशान ‘धडक’च्या रिलीजआधी ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’मध्ये दिसणार आहे. ALSO READ : लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले जान्हवी कपूरचे रूप,पाहा फोटो!मराठी चित्रपट ‘सैराट’ नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता. यात आॅनर किलिंगची कथा दाखवली गेली होती. या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवत १०० कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट हा मान मिळवला होता. यानंतर करण जोहरने या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे अधिकार खरेदी केलेत. अर्थात हिंदी रिमेकच्या स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्लेमध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहे.