Join us

'Thugs Of Hindostan'चे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:46 IST

सध्या यशराजचा सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सतत चर्चेत आहे.  सिनेमाचे एकपेक्षा एक मोशन पोस्टर्स रिलीज करण्यात येत आहेत. गत सोमवारी यातील आमिर खानचा लूक रिवील करण्यात आला.

ठळक मुद्दे27 सप्टेंबरला ठग्सचा ट्रेलर देखील आऊट होणार आहे या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते

सध्या यशराजचा सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सतत चर्चेत आहे.  सिनेमाचे एकपेक्षा एक मोशन पोस्टर्स रिलीज करण्यात येत आहेत. गत सोमवारी यातील आमिर खानचा लूक रिवील करण्यात आला. 27 सप्टेंबरला ठग्सचा ट्रेलर देखील आऊट होणार आहे. याआधी सिनेमाचे आणखीन एक पोस्टर लीक करण्यात आले. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होताना दिसतेय. यात आमिर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख आणि अमिताभ बच्चन वेगळ्याच अंदाजात दिसतायेत.  

ठग्स आॅफ हिंदोस्तान हा सिनेमा विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या सिनेमात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे. या सिनेमाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. या सिनेमातील फँटसी, अॅक्शन हे प्रेक्षकांना खरेखुरे वाटावे यासाठी सिनेमाच्या टीमने प्रयत्न केले आहेत. आजवर बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याच आऊटडोर चित्रीकरणाला इतका पैसा वापरण्यात आलेला नव्हता असे म्हटले जाते. या सिनेमासाठी खास दोन जहाजांची निर्मिती देखील करण्यात आली असून या जहाजांचे वजन जवळजवळ दोन लाख किलोच्या आसपास आहे. ही जहाजं बनवण्यासाठी वर्षांहून अधिक काळ लागला होता. तसेच गेम्स ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचे चित्रीकरण ज्या समुद्रकिनारी झाले, तिथेच या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.  

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानअमिताभ बच्चन