Join us

प्रभासच्या 'या' सिनेमावर ओटीटीवाल्यांची नजर? दिली 500 कोटींची ऑफर? वाचा, काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 3:29 PM

साऊथ सुपरस्टार Prabhasचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या सिनेमाची चर्चा होतेय आणि गेल्या 2 वर्षांपासून हा सिनेमा रखडला आहे.

साऊथ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas ) नवा सिनेमा ‘राधे श्याम’ ( Radhe Shyam )प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. खरं तर गेल्या 2 वर्षांपासून या सिनेमाची चर्चा होतेय आणि गेल्या 2 वर्षांपासून हा सिनेमा रखडला आहे.  प्रभासचा हा सिनेमा 2020 मध्येच रिलीज करण्याची योजना होती. पण कोरोना महामारीमुळे पुढचं सगळं फिस्कटलं. 2021 मध्येही सिनेमा रिलीज होऊ शकला नाही.

2022च्या जानेवारीत हा सिनेमा रिलीज होणार असताना पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा लांबलं. आता या चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर येतेय. होय, प्रभास व पूजा हेगडेचा (Pooja Hegde) हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यासाठी ‘राधे श्याम’च्या मेकर्सला 500 कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.

दिग्दर्शक म्हणतात...

 ‘राधे श्याम’ ओटीटीवर रिलीज करण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या चर्चा असताना या सिनेमाचे दिग्दर्शक के के राधा कृष्ण कुमार यांनी मात्र या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. ‘राधे श्याम’ चित्रपटगृहांतच रिलीज होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला तरच प्रेक्षक या चित्रपटाची भव्यता अनुभवू शकतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘राधे श्याम’ हा सिनेमा 14 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे पुन्हा एकदा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, आता अक्षय कुमारच्या बच्चन पांडे आणि रणबीर कपूरच्या शमशेरा या चित्रपटांसोबत ‘राधे श्याम’चा क्लॅश होणार आहे. अद्याप मेकर्सनी ‘राधे श्याम’ची फायनल रिलीज डेट जाहिर केलेली नाही. आता त्याला कधी मुहूर्त सापडतो ते बघूच.प्रभासचा ‘राधे श्याम’ ह सिनेमा तेलगू, तामिळ, कन्नड,मल्याळमसोबतच हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.

टॅग्स :प्रभास